२८ दिवसांपूर्वी झालेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन ६ महिन्यांपासून रखडल्याचा अजब खुलासा

कंबाला हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांतील वेतन अवघ्या २८ दिवसांपूर्वी झालेल्या पाचशे-हजाराच्या नोटाबंदीमुळे थकल्याचा अजब खुलासा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने केला आहे.

nagpur district court new building marathi news,
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचाही वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा…
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
maharashtra administration tribunal marathi news
सासवड मतदान यंत्रे चोरी प्रकरण; मॅटचा राज्य सरकारला दणका

मुळात आमच्या कर्मचाऱ्यांचा जुलैपासून नव्हे तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा पगार थकल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यालाही ८ नोव्हेंबरला लागू झालेले निश्चलनीकरण कारणीभूत असल्याचा अजब खुलासा रुग्णालयाने केला आहे. त्यामुळे याचा फटका सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत कसा होऊ शकतो, असा प्रश्न उभा राहिला आहे. ‘लोकसत्ता मुंबई’ने कंबाला हिल रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराबाबत १ डिसेंबर रोजी ‘कंबाला हिल व्यवस्थापनाचा मनमानी कारभार’ ही बातमी दिली होती. यावर व्यवस्थापनाने पाठविलेला हा खुलासा केला आहे. सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याची येथील कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नसून दागिने गहाण ठेवून घरखर्च करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. अनेकदा पगाराची विचारणा केल्यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनाकडून उत्तर आले नसल्याचा कामगारांचा आरोप आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, परिचर आणि आया यांचा पगार देण्यात न आल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाविरोधात आंदोलनाचा बडगा उगारला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ५ डिसेंबरला त्यावर सुनावणी आहे.

कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार केले जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत औषधे दिली जातात, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात येते. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात दिरंगाई करणे योग्य आहे का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. जुलैमध्ये काही कर्मचाऱ्यांना पगाराची अर्धी रक्कम देण्यात आली असली तरी घरकर्ज काढलेल्या कामगारांची कुचंबणा झाली आहे. रुग्णालयातून पगार येत नसल्यामुळे या कामगारांनी एक महिन्यापूर्वी संघटनेची स्थापना केली. कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णालयाला औषधांचा पुरवठा करणाऱ्या दोशी ब्रदर्स, मेहेरा आणि साईनाथ यांसारख्या २५ ते ३० औषध पुरवठादारांचे पैसेही थकविले आहेत.