गुरुवार, शुक्रवारी भूमिगत बोगद्याच्या जोडणीचे काम
मरोशी ते रुपारेल यांदरम्यान ३००० मिमी व्यासाच्या भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असले, तरी सहार अँकर ब्लॉक ते स्काडा केबिन वांद्रे येथे तीन ठिकाणी जलबोगदे जोडायचे आहेत. हे काम २९ व ३० ऑक्टोबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता संपणार आहे. त्यामुळे जी-उत्तर विभागात म्हणजेच धारावी परिसरात या दोन दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या कामामुळे गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग आणि कुंभारवाडा येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत ९० फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, लूप मार्ग, शास्त्री नगर, ९० फुटी रस्ता, शाहू नगर, जास्मिन मिल मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, संक्रमण शिबीर, संत कैकया मार्ग, शीव-माहीम जोडरस्ता या विभागात कमी दाबाने पाणी पुरवले जाईल. तसेच पाणी पुरवठय़ाच्या टोकाच्या क्षेत्राला असलेल्या प्रेम नगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम. जी. मार्ग आणि आंध्रा व्हॅली या भागांत पाणी पुरवठा बंद असेल. शुक्रवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग आणि कुंभारवाडा येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.