मुंबई – गोवा महामार्गावर महाडजवळ वहूर येथे झालेल्या अपघातात ३ जण ठार तर २२ जण जखमी झाले. त्यातील १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
 महाड शहरापासून काही अंतरावर मुंबई – गोवा महामार्गावरील वहूर गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला विघ्नहर्ता ट्रॅव्हल कंपनीची मिनी बस झाडावर आदळल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने हा अपघात घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमधील श्रेयस प्रदीप सनगरे (१२), रा. ओसवाल नगरी, नालासोपारा, मुंबई; निलेश यशवंत जांभळे (३२), रा. मनवेरपाडा, विरार, मुंबई; या दोघांचा म् उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर शालिनी लक्ष्मण सनगरे (६०) यांचा मुंबईला नेताना मृत्यू झाला.
जखमीमध्ये बळवंत सदाशिव मोहिते  रेखा बळवंत मोहिते,  प्रज्ज्वल बळवंत मोहिते , अथर्व बळवंत मोहिते हे सर्व न्यू गौतम नगर, गोवंडी, मुंबई. संजीवनी संतोष जाधव , साक्षी संतोष जाधव , स्वयंम संतोष जाधव  हे सर्व राहाणारे संत ज्ञानेश्वरनगर, बांद्रा नंदू कृष्णा गायकवाड , स्नेहा नंदू गायकवाड सलोनी नंदू गायकवाड  श्रेहान नंदू गायकवाड (११महिने) हे सर्व राहाणारे ओसवालनगरी, रौनक अपार्टमेंट नालासोपारा यांचा समावेश आहे.