पोलीस असल्याची बतावणी करून सराफांना गंडविणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी आणि दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अकिल अजगर अली सय्यद असे त्याचे नाव आहे. सय्यद हा साध्या वेशात सराफांच्या दुकानात जायचा आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने विकत घ्यायचा. मात्र आगाऊ रक्कम म्हणून काही हजार रुपये द्यायचा आणि पोबारा करायचा. पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत १८ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.