आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधी यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाच्या तरूण सिंग नावाच्या कार्यकर्त्याने असभ्य वर्तन केल्याची तक्रार एका महिला कार्यकर्तीने केली. त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल करू नये, यासाठी मयांक गांधी यांनी आपल्याला धमकावल्याचा पिडीत महिलेचा आरोप आहे. त्यामुळे विनयभंग करणाऱया कार्यकर्त्यांसोबत मयांक गांधी यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  मात्र, गांधी यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावत, राजकीय हेतूने हे आरोप करण्यात आल्याचे म्हटले आहे.