मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सक्तीची असून ही प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक
महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज विक्री – १४ जूनपर्यंत
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी – १४ ते २१ जूर्नपत
इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश प्रक्रिया – ७ ते २१ जूनपर्यंत ( हे प्रवेश देताना २१ जूनपूर्वी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी गरजेची आहे, ऑफलाइन प्रवेश स्वीकारले जाणार नाहीत.)
प्रवेश अर्जाची प्रिंट घेऊन महाविद्यालयात सादर करणे – १८ ते २२ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत. प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज आवश्यक)
पहिली गुणवत्ता यादी – २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता.
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २३ आणि २४ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
दुसरी गुणवत्ता यादी – २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता.
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २५ आणि २६ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
तिसरी आणि शेवटची गुणवत्ता यादी – रविवार, २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता.
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २७ आणि २८ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून मुंबई विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान (अनुदानित आणि विनाअनुदानित) या विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. या प्रवेश प्रक्रियेसंबंधीची लिंक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १२ जून रोजी उपलब्ध करून देण्यात येईल.
– लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव (जनसंपर्क)