‘एलएसडी पेपर’च्या दर्जातील फरक दर्शवण्यासाठी प्रतिमांचा वापर

उच्च शिक्षित तरुणांच्या टोळीकडून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने हस्तगत केलेल्या ‘एलएसडी पेपर’ या अमली पदार्थावर नटराज आणि बुद्धाची छायाचित्रे आहेत. प्रत्यक्षात ही चित्रे एलएसडीचा दर्जा ठरवण्याचे प्रतीक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. मुंबईतल्या श्रीमंत, सुखवस्तू घरातले तरुण पाटर्य़ामध्ये एलएसडी तस्करांकडे डान्सिंग शिवा (नटराज), लॉर्ड बुद्धा (गौतम बुद्ध), दलाई लामा अशी मागणी करतात. मिळालेल्या माहितीनुसार लामा हा भारतात सर्वात महागडा ‘एलएसडी पेपर’ आहे.

special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

अमली पदार्थविरोधी पथकातील अनुभवी अधिकाऱ्यांसह रेव्ह पाटर्य़ा झोडणाऱ्यांकडून (पार्टी अ‍ॅनिमल्स) मिळालेल्या माहितीनुसार लामा यांचे चित्र असलेला ‘एलएसडी पेपर’ क्वचित मिळतो. तो महाग असतो. कारण त्यावर ‘एलएसडी’चे प्रमाण जास्त असते. ‘एलएसडी’ची नशा पटकन चढते आणि जास्त वेळ टिकते. विशेषत: अमेरिकेत तयार होणारा ‘एलएसडी’ हा अमली पदार्थाचा (द्रवरूपातील) थेंब ब्लॉटिंग पेपरवर ओतले जातात. पुढे या पेपरचे टपाल तिकिटाच्या आकाराचे तुकडे करून विकले जातात. या एका टपाल तिकिटाच्या आकाराच्या ‘एलएसडी पेपर’ची किंमत दोन ते सात हजारांपर्यंत आहे.

तांडव करणाऱ्या शंकराचे चित्र असलेला ‘एलएसडी पेपर’ दोन हजार रुपयांना मिळतो. त्याची नशा कमी काळ टिकते. बुद्धाचे चित्र असलेला एलएसडी पेपरची पाच हजार रुपयांना मुंबईत विक्री होते, अशी माहिती मिळते.

कुरिअर कंपन्यांकरवी तस्करी?

एलएसडी प्रामुख्याने अमेरिकेत अवैधपणे तयार होते. कुरिअर कंपन्यांकरवी मोठय़ा प्रमाणात हा महागडा अमली पदार्थ भारतात धडकतो. भारतात मनाली, गोवा, मुंबई या तीन प्रमुख ठिकाणांवरून त्याची विक्री छोटय़ा विक्रेत्यांना आणि ग्राहकांना केली जाते. ज्या राज्यातून विकला जातो त्यानुसार एलएसडी पेपरवरील चित्र बदलते.