हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्याकडून २५ कोटी रुपयांत खरेदी

संगीतप्रेमी रसिक आणि श्रोते यांनी एकेकाळी गजबजून गेलेले ‘ऱ्हिदम हाऊस’ आता लवकरच ‘रत्न’गृह होणार आहे. बंद पडलेल्या ‘ऱ्हिदम हाऊस’ची जागा हिरेव्यापारी नीरव मोदी यांनी विकत घेतली असून आता इथे लवकरच हिरे, दागदागिने यांची खरेदी-विक्री करणारे भव्य दालन सुरू होणार आहे. जागाविक्रीचा हा व्यवहार सुमारे २५ कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते.

heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Mumbai temperature at 37 degrees
मुंबईचा पारा ३७ अंशावर
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?

संगीतविषयक ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती यांची विक्री करणारे आणि संगीतप्रेमी आणि श्रोत्यांचे हक्काचे ठिकाण असलेले ‘ऱ्हिदम हाऊस’ गेल्या वर्षी मार्च महिन्यात बंद पडले. कुर्मली कुटुंबाची मालकी असलेल्या ‘ऱ्हिदम हाऊस’ने गेली सत्तर वर्षे संगीतप्रेमी आणि श्रोत्यांना सेवा उपलब्ध करून दिली. सर्वसामान्य संगीतप्रेमी आणि श्रोत्यांसह गायक, संगीतकार, संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कलाकार मंडळींचीही येथे ये-जा असायची. ग्रामोफोनच्या तबकडय़ा, ध्वनिफिती विक्रीपासून सुरू झालेला हा प्रवास सीडीपर्यंत येऊन थांबला होता.

‘ऱ्हिदम हाऊस’ची ही जागा सुमारे ३ हजार ५०० चौरस फूट इतकी आहे. काळा घोडा परिसरातील ‘रेडी रेकनर’च्या दरानुसार खरेदी-विक्रीचा हा व्यवहार सुमारे २५ कोटी रुपयांना झाल्याचे सांगण्यात येते. कुर्मली कुटुंबीयांकडून मात्र ‘ऱ्हिदम हाऊस’ च्या खरेदी-विक्रीत नेमका किती व्यवहार झाला त्याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात असलेले ‘ऱ्हिदम हाऊस’ हे संगीत, कला याचे प्रमुख असे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीतापासून ते संगीताच्या अन्य विविध प्रकारातील ध्वनिफिती, सीडी यांचे हे माहेरघर होते. एखाद्या संगीतप्रेमी श्रोत्याला ध्वनिफीत वा सीडी हवी असेल तर त्याच्यासाठी ‘ऱ्हिदम हाऊस’ हे हक्काचे ठिकाण होते.  सतारवादक पं. रविशंकर हेही येथे वेळोवेळी भेट द्यायचे. काळानुरूप संगीत ऐकण्यातही बदल झाला. तबकडय़ा, ध्वनिफिती, सीडी यांची जागा ‘एमपी थ्री’ यांनी घेतली. त्यामुळे ‘ऱ्हिदम हाऊस’ अखेर गेल्या वर्षी हे बंद झाले.