नव्या आर्थिक वर्षात सर्वच सेवा आणि वस्तू महाग होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी घट करण्यात आली. त्यामुळे अच्छे दिनाची वाट पाहणा-या सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल १ रुपये २१ पैशांनी स्वस्त झालं आहे. हे नवे दर बुधवार रात्रीपासून लागू होतील.
बेस्टच्या तिकिटांची दरवाढ, रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात थेट दुप्पट वाढ आणि रेल्वेच्या तात्काळ कोटय़ातील तिकिटांपैकी ५० टक्के तिकिटांची चढय़ा दराने विक्री, या सर्व गोष्टी १ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होणार असल्याने मुंबई महापालिका व केंद्र सरकार यांनी मुंबईकरांना पुरेपूर ‘फूल’ बनवण्याची सोय केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे.