कोकण किनारपट्टीच्या सागरी महामार्ग क्रमांक चारवरील डहाणू बोर्डी-रेवस रेड्डी-सातर्डे दरम्यान बागमांडला आणि वेश्वी दरम्यानच्या बाणकोट खाडीवर वरळी-सी लिंकप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महत्त्वाकांक्षी सागरी सेतू उभारण्यात येणार आहे. यासह रायगड जिल्ह्य़ात काळेश्री, धरमतर, आगरदांडा येथेही अशीच पुलांची साखळी उभारण्यात येणार आहे.
सर्वात आधी बांधण्यात येणारा बाणकोट खाडीवरील हा सेतू २०१५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून अंदाजित खर्च २९७ कोटी रुपये इतका आहे. या सेतूमुळे रायगड व रत्नागिरी जिल्हे सागरी मार्गाने जोडले जातील, शिवाय या जिल्ह्य़ांतील पर्यटन व्यवसाय आणि निर्यात वाढीला चालना मिळणार आहे.
कोकण किनारपट्टीलगत सागरी महामार्ग आहे. मात्र अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार पुलांची उपलब्धता नसल्यामुळे वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून होते. त्याचा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर होतो. वाहतुकीचा बोजा वाढून अपघातांचे प्रमाणही या महामार्गावर वाढले आहे. शिवाय वेळ आणि इंधनाचा अपव्ययही होत आहे. या पुलामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
काळेश्री व धरमतर येथील पुलांसाठी सुमारे २९२ कोटींचा खर्च असून नाबार्डकडून मिळणाऱ्या या पैशाला मंजुरी मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम रायगड विभागाचे अधीक्षक अभियंता एस. व्ही. सोनटक्केयांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्हय़ांना लाभलेल्या विस्तीर्ण सागरीकिनाऱ्याला लागून असणाऱ्या महामार्गावर पूल उभारून सागरी महामार्गाचा अधिक विस्तार करण्यात येत असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.

बाणकोट खाडीवरील पुलाचे फायदे
0 रायगड-रत्नागिरी जिल्हे सागरी महामार्गाने जोडले जाणार.
0 रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, मंडणगड या तालुक्याच्या परिसरातील वाणकोट, केळशी आदी ठिकाणी मिळणारे बॉक्साइट रायगड जिल्हय़ातील दिघी बंदरातून निर्यात करणे शक्य होईल. त्यामुळे परकीय चलनात मोठय़ा प्रमाणात वाढ होईल.
0 रायगड जिल्ह्य़ातून रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या पर्यटकांना मंडणगड, दापोलीमार्गे सर्वात जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवासाचे अंतर ५० ते ६० किमीने कमी झाल्याने प्रवासाच्या वेळेत आणि इंधनामध्ये मोठय़ा प्रमाणात बचत होईल.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

प्रस्तावित पूल
*    काळेश्री ते पेण
*    धरमतर ते पेण (अलिबाग)
*    आंगरदांडा ते श्रीवर्धन

पुलाची वैशिष्टय़े
*  पुलाचे मध्यवर्ती गाळ्यांचे बांधकाम बांद्रा-वरळी सी-िलक पुलासारखे केबल स्टे या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने पर्यटकांसाठी आकर्षण.
*  पुलाची लांबी १३७५ मीटर
*  जोडरस्त्यासह पुलाची लांबी १८३७ मीटर
*  पुलाची रुंदी १२.५० मीटर
*  पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांमधून नेव्हिगेशन वाहतुकीची सोय.
*  पूल पाइल फाउंडेशनवर आधारित आहे.