मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाला एक वेगळी ओळख देणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार होत असल्याचे लिलावती रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. सुधीर डगावकर यांनी सांगितले.
'हलाकू', 'हाफ तिकीट', 'डॉन' अशा अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या प्राण यांची तब्बेत काही दिवसांपासून बिघडली होती. शुक्रवारी ते लिलावती रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. मात्र या तपासणीच्या वेळी त्यांच्या श्वसनयंत्रणेत काहीतरी बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. मात्र सध्या त्यांची तब्बेत ठीक असून ते अजूनही रुग्णालयातच आहेत, अशी माहिती डॉ. डगावकर यांनी दिली.
तब्बल ३५० हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्राण यांना २००१मध्ये सरकारने चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















