खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर १३ येथील दत्तकृपा शासकीय शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील ‘वृंदावन’ खासगी शिकवणी वर्गात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली. अक्षय पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे.  न्यू होरायझन शाळेची विद्यार्थिनी असलेली पीडित मुलगी दोन वर्षांपासून ‘वृंदावन’मध्ये शिकवणीसाठी येते. अक्षय हा तिची शिकवणी घेत होता. तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.