विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेच्या प्रक्तेपदांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, डॉ. मनिषा कायंदे अशा नवीन चेह-यांना प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे.
पक्ष प्रवक्ते हे माध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात. मात्र शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून प्रवक्त्यांची भूमिकाच पक्षाला अडचणीत आणणारी ठरत होती. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने सहा नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये निलम गोऱ्हे यांना कायम ठेवून अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, डॉ. मनिषा कायंदे, विजय शिवतारे या नव्या चेहऱयांची प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे.