येथील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी रात्री संशयित शिडाची नौका फिरत असल्याची माहिती कळताच उरण तसेच नवी मुंबईमधील पोलिसांची धावपळ उडाली.
मात्र तपासणीनंतर नौकेतील नागरिक स्थानिकच असून नौका भरकटल्याने हा संशय निर्माण झाल्याचे लक्षात आले. अखेर नौकेतील सहा जणांची माहिती घेऊन व कागदपत्रांची खातरजमा करून रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आल्याची माहिती मोरा सागरी पोलिसांनी दिली. मात्र त्यामुळे तब्बल दोन ते अडीच तास या नौकेचा शोध सुरू होता.