‘गुगेनहाइम’ या न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध कला-संग्रहालयात भाऊबिजेच्या दिवशी (२४ रोजी) वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरू होत आहे. आधुनिक कलेची मक्का मानल्या जाणाऱ्या या संग्रहालयाच्या शाखा युरोप आणि पश्चिम आशियात असल्या, तरी आजवर भारतीय चित्रकारांशी या संग्रहालयाने दुरावाच बाळगला, परंतु किमान २२ भारतीय तसेच तीन परदेशी व्यक्ती आणि चार भारतीय संस्था यांनी गायतोंडे यांची स्वतच्या संग्रहातील चित्रे देऊन गायतोंडे यांच्या प्रदर्शनाचे यश निश्चित केले आहे.
mu04खुद्द गुगेनहाइम संग्रहालयानेच दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ‘पंडोल आर्ट गॅलरी’ या – गायतोंडे यांची सदैव पाठराखण करणाऱ्या कलादालनाने मोठी मदत केलीच, पण चित्रसंग्राहक पिरोजा गोदरेज, पूनम भगत (श्रॉफ)  तसेच मुंबईतून ‘आर्ट इंडिया’ हे कलात्रमासिक चालविणाऱ्या संगीता जिंदाल व त्यांचे पती सज्जन जिंदाल यांच्याही खासगी संग्रहांतील चित्रे अमेरिकेत प्रदर्शनासाठी गेली. गायतोंडे यांनी १९८० च्या दशकानंतर २००१ पर्यंतचे सारे आयुष्य ज्या दिल्लीतच काढले, तेथील वढेरा आर्ट गॅलरी व गुजराल फाउंडेशन या संस्था आणि ‘एचसीएल’चे संस्थापक शिव नाडर व त्यांच्या चित्रसंग्राहक पत्नी किरण यांची मदत मोलाची आहेच, परंतु पश्चिम आशियाई देशांतील मोठे भारतीय उद्योजक म्हणून ओळखले जाणारे रमेश प्रभाकर आणि संजय मोटवानी यांनीही या प्रदर्शनास मदतीचा वाटा उचलला.
काळदातेंची फिल्म ‘कळली’!
गायतोंडे यांच्यावरील ज्या फिल्मने या प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे, ती सुनील काळदाते यांनी, पंडोल आर्ट गॅलरीचे दादीबा पंडोल यांच्या सहकार्याने १९९५ मध्ये बनविली होती. १९९७ मध्ये मुंबईत तिचा खेळ झाला तेव्हा मात्र एका अमूर्त-चित्रकारानेच तिच्यावर आक्षेप घेतला होता, अशी आठवण खुद्द काळदाते यांनी ‘लोकसत्ता’मध्ये २२ डिसेंबर २०१३ रोजी लिहिलेल्या लेखात नमूद आहे.. काळदाते खचलेच;तेव्हा  ‘कवी आदिल जस्सावाला, चित्रकार मेल्ही गोभई यांनी धीर दिला. .. ही फिल्म लोकांना कळायला वेळ लागेल, म्हणाले’ असे काळदाते लिहितात. न्यूयॉर्कच्या संग्रहालयात मानाचा खेळ होण्यापूर्वी, पॅरिसच्या ‘सेंटर पॉम्पिदू’ कला संग्रहालयात तिची निवड झाली होती.
मुंबईचे अमूर्त-यात्री!
भारतीय अमूर्त चित्रांच्या ज्या परंपरेतील गायतोंडे हे महत्त्वाचे नाव, ती परंपरा मुंबईची आणि खास ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मधलीच! शंकर पळशीकर, प्रभाकर कोलते आणि सध्या सुधाकर यादव या तीन पिढय़ांतील अध्यापकांचे विचार या  परंपरेला बळकट करणारे आहेत. यापैकी पळशीकरांच्या भारतीय आध्यात्मावर आधारित चित्रांपेक्षा वेगळी झेन-चिंतनाची वाट स्वतच्या चित्रांत येऊ देणारे गायतोंडे हे नंतरच्या पिढय़ांना दीपस्तंभासारखेच, त्यामुळे त्यांचे प्रदर्शन हा एक प्रकारे मुंबईच्या कलापरंपरेचा सन्मान आहे, अशी भावना तरुण मुंबईकर अमूर्त-चित्रकार व्यक्त करतात. ‘हेच अमेरिकी, याआधी मुंबईच्या अमूर्तशैलीला त्यांच्याकडील अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझमची नक्कल मानत’ याकडे प्रदर्शनाच्या संकेतस्थळावरील माहिती वाचलेल्या एका चित्रकाराने लक्ष वेधले.
गुगेनहाइम संग्रहालयाने गायतोंडे यांच्या सिंहावलोकनी प्रदर्शनाचे नाव ‘पेंटिंग अ‍ॅज प्रोसेस, पेंटिंग अ‍ॅज लाइफ’ असे ठेवले असून प्रदर्शनाच्या नियोजक संधिनी पोद्दार यांनी त्याच नावाचे पुस्तकही लिहिले आहे. एकंदर ९० रंगीत चित्रे असलेल्या या पुस्तकाचे हे मुखपृष्ठ.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?