सांताक्रूझ येथे वाकोला पाईप लाईन रस्त्यावर सोमवारी पहाटे इमारतीची िभत झोपडय़ांवर कोसळून चौघांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले. मृतांमध्ये एका सहा वर्याच्या बालकाचा आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. मुंबईत झाडे कोसळल्याने या पावसाळ्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ग्रॅण्ड हयात हॉटेलजवळील ‘द आर्क सोसायटी’मधील झाड भिंतीवर कोसळले. यामुळे िभत रस्त्यालगतच्या कच्च्या झोपडय़ांवर पडली. या घटनेत संतोष अर्जुन (६), सरोजा कडवेल (४८), अनिषा कडवेल (४२) आणि प्रमिला पलमराजू (२८) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. दीड वर्षांची जयश्री व तीन वर्षांच्या परमेश्वरी या बालिकांसह धनलक्ष्मी(१९), मरे चिन्नपय्यन (१५) आणि मंगेशा वेल्लया (३५) जखमी झाले. जखमींवर व्ही एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.