गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा तसेच गुजरातमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी धमकीचे पत्र पाठवले आहे. याप्रकरणी अंबानी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
२४ फेब्रुवारी रोजी अज्ञात व्यक्तीने मेकर चेंबरमधील मुकेश अंबानी यांच्या कार्यालयात जाऊन बंद लिफाफा कर्मचाऱ्यांकडे दिला. तसेच अल्टामाऊंट रोड येथील अंबानी यांची २७ मजली अंटिलिया इंडियन मुजाहिदीन उद्ध्वस्त करणार असल्याची धमकी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.