30 May 2016

केबल चोरीस गेल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत

एल्फिन्स्टन रोड आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेची सिग्नल केबल अज्ञात व्यक्तीने चोरल्यामुळे शुक्रवारी

प्रतिनिधी, मुंबई | February 15, 2013 9:34 AM

एल्फिन्स्टन रोड आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेची सिग्नल केबल अज्ञात व्यक्तीने चोरल्यामुळे शुक्रवारी रात्री पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा उठवत सिग्नल केबल कापली. केबल तुटल्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडली आणि चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उपनगरी वाहतूक नेमकी कशामुळे बंद झाले हे प्रवाशांना कळत नव्हते. सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. तब्बल अध्र्या तासानंतर वाहतूक सुरू झाली. केबल चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत वाहतूक २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

First Published on February 15, 2013 9:34 am

Web Title: western railway desterbed due to signal cable stolen 2