मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे. या निर्णयामुळे पुरुषांबरोबरच आता महिलांना देखील मजारमध्ये प्रवेश मिळणार आहे. या निर्णयांचे अनेक महिला कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समाजात उमटत आहेत. न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे बीएमएमएच्या सहसंस्थापक नूरजहाँ नियाझ यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. महिलांना मासिक पाळी येते म्हणून त्यांना प्रवेशबंदी दिले जाते असा दावा करत दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणून नूरजहाँ यांनी प्रवेशबंदी विरोधात लढा सुरू होता. त्यांनी यासाठी उच्च न्यायलयात याचिका देखील दाखल केली होती. न्यायलयाच्या या निर्णयामुळे भविष्यात आता कोणत्याही महिलेला अशा अपमानाला समोर जावे लागणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तर या निर्णयामुळे लोकशाहित न्यायलयाने मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिला असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ती झाकिया सोमण यांनी दिली आहे.सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी देखील न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहेत. न्यायलयाने प्रवेशाचा निर्णय देऊन ऐतिहासिक निर्णय दिला आहे यासाठी त्यांनी आभारही मानले. तर दुसरीकडे गुलाल उधळून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी आपला विजय साजरा केला .  न्यायालयाचा निर्णय म्हणजे दर्ग्यात प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन करणा-या सगळ्या महिलांचा विजय आहे असे तृप्ती देसाईंनी सांगितेल. २८ ऑगस्टला आपण हाजी आली दर्ग्यात प्रवेश करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. हाजी आली दर्ग्यात प्रवेश मिळवण्यासाठी भूमाता ब्रिगेडने आंदोलन केले होते. त्यांचे हे आंदोलन चांगलेच वादाच्या भोव-यात सापडले होते. मजारपर्यंत प्रवेश मिळावा यासाठी जेव्हा आपण आंदोलन केले तेव्हा जीवे मारण्याच्या धमक्या आपल्याला दिल्या होत्या पण आता उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे आपण २८ ऑगस्टला मजारपर्यंत जाऊन प्रवेश घेऊ असे त्यांनी सांगितले.  न्यायालयाने दिलेल्या निर्यणाचे महिलांकडून स्वागत होत असले तरी या निर्णयावर हाजी अली विश्वस्त मात्र नाराज आहे. आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायलयात जाऊ असेही विश्वस्तांनी  सांगितले. तर मौलाना साझिद रशिदी यांनी देखील न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. न्यायालयाला शिरिया कायदा माहिती नसल्याने त्यांची हा निर्यण देऊन चुकीचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.