वृक्षप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या एम्प्रेस गार्डनचा इतिहास आणि या उद्यानात असलेल्या वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची माहिती तसेच बागेतील वृक्षांची सूची पुस्तकरूपाने उपलब्ध झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्योगपती राहुल बजाज यांच्या हस्ते करण्यात आले.
एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अ‍ॅग्री हॉल्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्नन इंडिया या निसर्गप्रेमी संस्थेतर्फे केले जाते. बागेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना तसेच वृक्ष व निसर्गप्रेमींना वृक्षांची माहिती व्हावी, या उद्देशाने संस्थेने एक प्रकल्प हाती घेतला असून त्या अंतर्गत बागेतील प्रत्येक वृक्षाची माहिती देणारा फलक त्या त्या वृक्षावर लावण्यात येणार आहे. या फलकावर वृक्षाचे शास्त्रीय नाव, कुळ, उपलब्ध संस्कृत तसेच प्रचलित मराठी अथवा इंग्रजी नाव अशी माहिती असेल.
या प्रकल्पाबरोबरच बागेची माहिती देणारे पुस्तकही तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन राहुल बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन आणि डॉ. पराग महाजन यांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. त्यात एम्प्रेस गार्डनमधील वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची माहिती, उद्यानाचा इतिहास, बागेतील वृक्षांची सूची आदी माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रकाशन कार्यक्रमात संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, उपाध्यक्ष सुमन किलरेस्कर, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, डॉ. फिरोज पूनावाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…