स्वातंत्र्यदिनी घोषणेची शक्यता; नकाशाही प्रसिद्ध
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू होणार असून स्वातंत्र्यदिनी आयुक्तालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नव्या पोलीस आयुक्तालयाची हद्द व कार्यकक्षेचा नकाशादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत असून गेल्या काही वर्षांत शहरातील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या नागरिकांच्या वाहनांची मोडतोड, टोळ्यांमधील संघर्षांतून होणारे खून, चोरी, लूटमार अशा गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी नागरिकांकडून केली जात होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या रामटेकडी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू करण्याचे सूतोवाच केले होते.
या संदर्भातील माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. स्वातंत्र्यदिनी नव्या पोलीस आयुक्तालयाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. स्वतंत्र आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी जागादेखील निश्चित करण्यात आली आहे. प्राधिकरणातील इमारतीतून स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार चालेल.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी एक पोलीस आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक गृह विभागाकडून करण्यात येईल. पिंपरी पोलीस आयुक्तालयासाठी सध्या पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाचा वापर करण्यात येईल. भविष्यात पिंपरीसाठी नवीन मोटार परिवहन विभागाची निर्मिती करण्यात येईल. तांत्रिक सुविधा व पायाभूत सुविधादेखील उभारण्यात येतील.

दोन परिमंडल
* नव्याने होऊ घातलेल्या पोलीस आयुक्तालयात दोन परिमंडल (झोन) असतील.
* परिमंडल एकच्या हद्दीत चाकण, आळंदी, दिघी, एमआयडीसी, भोसरी, पिंपरी, चिंचवड या सात पोलीस ठाण्यांचा समावेश असेल.
* परिमंडल दोनच्या हद्दीत सांगवी, वाकड, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, देहू रोड, निगडी आणि प्रस्तावित चिखली पोलीस ठाण्यांचा समावेश असेल.
* पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे, आळंदी या चार पोलीस ठाण्यांचा समावेश नव्याने होऊ घातलेल्या पिंपरी पोलीस आयुक्तालयात होणार आहे.

Damage to crops on 82 thousand hectares due to hailstorm
गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात