पिंपरी चिंचवडसह भाजप ने आठ महानगर पालिकेवर आपला विजयी झेंडा फडकवला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बद्दल विजयी आणि पोषक वातावरण असताना राष्ट्रवादी पक्ष हा केवळ ३५ विजयी आकड्यापर्यंत मजल मारता आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीची शहरात विजयाची हवा असताना देखील हा पक्ष का पडला असा प्रश्न राजकीय जाणते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना नक्कीच पडला असेल यात काही शंका नाही. मुळातच भाजपचे नेतृत्व आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी कंबर कसली होती सोबत प्रत्येक ठिकाणी आपल्या उमेदवाराला त्यांनी खंबीर पाठिंबा दिला. त्यांनी महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी पॅनल टू पॅनल काढला त्यामुळे त्यांना विजय सोपा झाला. राष्ट्रवादीतील या निवडणुकीत गटबाजी दिसली आणि याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती राष्ट्रवादीने विकास केला या बद्दल तिळमात्र शंका नाही त्यासोबत अनेक कारभार हे भ्रष्टचारी आणि घोटाळे देखील झाले. त्यामध्ये विद्युत शवदाहिनी घोटाळा, घरकुल योजना घोटाळा, झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा, असे अनेक घोटाळे हे राष्ट्रवादीच्या विजयाला अडसर ठरले आहेत. पिंपरी महानगर पालिकेच्या १५ वर्षांच्या कारभारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून केल्याला भ्रष्टाचाराचा फटका या निवडणुकीत बसला आहे.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
pawar group fixed 10 candidates for lok sabha election 2024 zws
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जागावाटप जाहीर; अहमदनगरमधून निलेश लंकेच्या नावाची घोषणा

१५ वर्ष हे राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत सत्तेचे राज्य गाजवलं मात्र यावेळेस नागरिकांना बदल हवा होता म्हणून त्यांनी भाजपच्या हातात सत्ता दिली. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या दोन सभा आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर केलेली टीका याचा फायदा भाजप झाला तर राष्ट्रवादी पक्ष्याला त्याचा फटका बसला. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र याचा फायदा या महानगर पालिकेच्या निवडणुकीत झाला. सोबत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात योग्य नियोजन लावले होते. त्यामुळे गटबाजी झाली नाही आणि मत फुटले नाही.