22 August 2017

News Flash

‘ती’ बलात्काराची तक्रार खोटी, महिलेची पोलिसांसमोर कबुली

पूर्व वैमनस्यातून रचलेला डाव पोलिसांनी उधळला.

पुणे | Updated: June 19, 2017 2:26 PM

(प्रतिकात्मक छायाचित्र)

उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात महिलेवर सामूहिक बलात्काराची नोंदवलेली तक्रार खोटी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पारनेरमधील दोन गुंडांनी पूर्व वैमनस्यातून महिलेचा आधार घेत दोघांना तुरुंगात पाठवण्याठी हा सर्व प्रकार केला होता. उरुळी कांचन- जेजुरी मार्गावर शिंदवणे  घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा आणि लोणी काळभोर पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करताना ही तक्रार खोटे असल्याचे उघडकीस आणले. सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केलेल्या महिलेने पोलिसांसमोर यासंदर्भात कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे येथे घटनेनंतर संबंधीत महिलेकडे आधिक चौकशी करत असताना काही संशयास्पद माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला. यावेळी पारनेर येथील नारायण गव्हाण आणि संदीप जगदाळे या दोन गुडांनी पूर्व वैमनस्यातून आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव येथील महिलेच्या माध्यमातून बलात्काराचा कट रचण्यात आल्याचे समोर आले. या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देण्यासाठी दोन तरुणांना पैसे देण्यात आले होते. तसेच संबंधीत महिलेनेही गव्हाण आणि जगदाळे यांच्या सांगण्यावरून खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली.

देव दर्शनाहून घरी परतत असताना धमकावून मोटारचालक आणि त्याच्या साथीदाराने  बलात्कार केल्याची तक्रार महिलेने दाखल केली होती. या तक्रारीनंतर  पीडित महिलेने दिलेल्या मोटारीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींची नावे शोधून काढून शनिवारी त्यांना ताब्यात घेतले होते. तक्रारदार महिला मूळची दौंड तालुक्यातील केडगावची रहिवासी आहे.

First Published on June 19, 2017 2:00 pm

Web Title: woman fake alligation of rape in pune
 1. S
  Suhas Replase
  Jun 19, 2017 at 8:45 pm
  मा. संपादक , महोदय, मी आपला मनापासून आभारी आहे. ज्या तत्परतेने सगळ्यांनी बलात्काराची बातमी छापली ,तितक्याच तत्परतेने आपण त्या बातमी तले वास्तव समोर आणले . जर हे वास्तव समोर आले नसते तर त्या दोन तरुणांचे आयुष्य उध्वस्त झाले असते , आता तरी समाजाने अशा घटनांचा बारीक विचार करावा. व पुरुषांची बाजू सुद्धा ऐकून घ्यावी . या बातमीबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.
  Reply
 2. v
  vishal_b
  Jun 19, 2017 at 2:35 pm
  सुरुवातीपासूनच आलेल्या बातमीत काही तरी घोळ वाटत होता. अनोळखी, अविश्वासू व्यक्तींकडून लिफ्ट आणि तीही रात्रीच्या वेळी एकटी बाई घेण्याइतपत या देशातील कायदे प्रबळ नक्कीच नाहीत. सध्याच्या महिलांसाठीच्या कायद्यात पुरुष वर्ग नको तितका बदनाम केलेला असल्याने, कायद्याचे हे दुष्परिणाम आता कुठे दिसू लागले आहेत. तसे गेल्या २० वर्षात अनेक पुरुषांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कित्येक केसेस मध्ये महिलांनी ह्या कायद्यांच्या गैरवापराने छळले आहे पण त्यावेळी देशात सदर कायद्याची इतकी नशा पसरली होती कि कोणी पुरुषांची बाजू ऐकायला सुद्धा तयार नव्हते. आता हळूहळू जाग येतेय. यापुढे तरी सदर कायद्याचा दुरुपयोग करणा-या महिलांना जबरी शिक्षा करायचा आणि त्यांचे नाव प्रसिद्ध करायचा कायदा लवकर संमत करून ज्या कोणी बिनडोक सरकारने हा एकतर्फी कायदा केलाय त्याला आवर घाला. स्त्री-पुरुष समानता आहे आणि जगात सगळीकडे स्त्रियांसाठी तुरुंगसुद्धा आहेत. त्यातून हेच दिसतं कि पुरुषांप्रमाणेच स्त्रिया सुद्धा आरोपी असू शकतात. त्यामुळे कोणत्याही एकाची बाजू डोळे झाकून न घेणेच उत्तम.
  Reply