तंतुमय पदार्थ, रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक. याच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही. तंतुमय पदार्थ आपणास पुढील अन्नघटकांपासून मिळतात. विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या इत्यादी.
तंतुमय पदार्थ घेण्याचे प्रामुख्याने पुढील फायदे असतात.
* रोजची मलप्रवृत्ती साफ राहण्यास मदत होते.
* वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात.
* कोलेस्टरॉल कमी होते.
* मधुमेही रुग्णांची साखर आटोक्यात राहते.
* खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव देत असल्याने वजन वाढवणारे अतिरिक्त अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात.
* स्वयंपाकादरम्यान काही जीवनसत्त्वाचा ऱ्हास होतो. काही तंतुमय पदार्थ कच्चे खाल्ल्याने शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते.
हिवाळ्यामध्ये पचनशक्ती चांगली असल्याने कच्च्या पदार्थाचे प्रमाण जेवणामध्ये जास्त असण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ कच्चे सॅलड, कोशिंबीर, कच्च्या भाज्यांचा ज्यूस, कच्ची मोड आलेली कडधान्ये इत्यादी. चपाती/ भाकरी कोंडय़ासकट करावी. भाज्या जास्त प्रमाणात शिजवू नयेत. सॅलड, भाज्या कापून जास्त वेळ उघडय़ा वातावरणात ठेवू नयेत. चवीप्रमाणे मीठ/ सैंधव, मिरेपूड, जिरेपूड, धणेपूड, लिंबू आदी पदार्थ वापरून सॅलड/ कडधान्ये खावीत.
जे पदार्थ आपण कच्चे खाऊ शकत नाहीत ते पदार्थ शिजवून/ वाफवून घेण्यास हरकत नाही. तसेच ज्यांची पचनशक्ती मंद आहे, अपचनाचा ज्यांना त्रास होतो त्यांनी पदार्थ कच्चे न खाता शिजवून घ्यावे.
तंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रियेमध्ये अन्न पुढे साकारण्याचा कालावधी वाढतो परिणामी अन्न एका जागी जास्त वेळ पडून राहते व आम्लपित्त, बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन, ढेकर भूक न लागणे इ. अनेक तक्रारी सुरू होतात. हिवाळ्यात पाणी व तंतुमय पदार्थ कमी पडले व त्याबरोबर शारीरिक हालचाली कमी पडल्या की बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. तसेच मांसाहाराचे प्रमाण आहारात जास्त असेल आणि त्याबरोबर तंतुमय पदार्थ कमी असतील तरी या तक्रारी वाढू शकतात. म्हणून हिवाळ्यात तंतुमय पदार्थ अवश्य घ्यावेत व आपल्या पचनशक्तीनुसार कच्चे/ शिजवलेले यापैकी कोणत्याही स्वरूपात घ्यावे.

डॉ. सारिका सातव
आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

Video 5 Minutes Jugaad to Clean Water Tanki At Home Remove All Dirt Stickiness
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video
Giraffe has to face many problems while drinking water shocking video
“आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा…” जिराफाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल यामागचं कारण
स्निग्ध पदार्थ खा, पण नियंत्रणात
Kidney Disease Or Kidney Stone
किडनी निरोगी ठेवायचीय? हे आहेत सोपे अन् तितकेच प्रभावी घरगुती उपाय