सध्याच्या काळात ‘वय वर्षे अवघे पाऊणशे’ हा शब्दप्रयोग दुर्मीळ होत चालला आहे. त्यामुळे आपला शंभरावा वाढदिवस आनंदाने साजऱ्या करणाऱ्या माणसांबद्दल अतीव आदर वाटतो. त्यातही तो माणूस बोरीस पाहोर आहे, याचा तर विशेष आनंद व्यक्त करायला हवा. कालच्या २६ तारखेला पाहोर या सोव्हियन लेखकाचा वाढदिवस इटलीत मोठय़ा आनंदाने साजरा करण्यात आला. विसाव्या शतकातल्या नरसंहाराचे साक्षीदार असणाऱ्या पाहोर यांनी त्याविषयी कथा-कादंबरी लेखन केले आहे. त्यांचे जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत.
सोव्हियातले जागतिक पातळीवर ज्ञात असलेले प्रमुख लेखक म्हणजे पाहोर. त्यांची नोबेल पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली होती, पण त्याला त्यांच्याच देशातल्या काही संघटनांनी विरोध केला होता. तर ते असो. राजकारण, समाजकारण आणि साहित्य यांचा उत्तम अनुबंध ही पाहोर यांची जीवनधारणा आहे.
नाझीवादाची लक्तरे वेशीवर टांगणारा, त्या काळ्याकुट्ट इतिहासाचा हा साक्षीदार आजही आपल्यात आहे, ही थोर म्हणावी अशीच गोष्ट आहे.  

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द बोन सिझन : सामंथा शेनॉन, पाने : ४८०४९९ रुपये.
फ्लाय ऑन द वॉल अँड अदर स्टोरीज : सुभा सर्मा, पाने : ३०८२४० रुपये.
जॉयलँड : स्टिफन किंग, पाने : २८८३५० रुपये.
नेव्हर गो बॅक : ली चाइल्ड, पाने : ४४०५९९ रुपये.
अनएक्सप्लोडेड : अ‍ॅलिसन मॅक लिओल्ड, पाने : ३५२६९९ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
माय जर्नी- ट्रान्सफॉर्मिग ड्रीम्स इनटु अ‍ॅक्शन्स : एपीजे अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.
मीना कुमारी : विनोद मेहता, पाने : २४८३५० रुपये.
अ‍ॅडव्हान्टेज हॉलीवूड – अशोक अमृतराज, पाने : २०८/४९९ रुपये.
ग्रँड मस्ती-फन नेव्हर एन्ड्स : नेहा पुणतांबेकर, पाने : १२२१२५ रुपये.
दादा- द जर्नी ऑफ अ फ्रेंड : विभोर टिकिया, पाने : १५६१४९ रुपये.