आपलं विश्व नेमकं कसं आहे ? या बद्दलच्या कल्पना सोळाव्या आणि सतराव्या शतकात बदलू लागल्या होत्या. जरी पृथ्वी केंद्रित विश्वाच्या संकल्पनेत ग्रहांच्या स्थितीचं अचूक भाकित करणं शक्यं होतं नसलं तरी एक निश्चित होतं, की पृथ्वी केंद्रित विश्वाच्या संकल्पनेच्या विरूद्ध आवाज काढायला कोणी धजतही नव्हतं.
जियोर्दोनो ब्रुनो हा एक इटालियन दार्शनिक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि कवी होता. हा तर कोपíनकसच्या एक पाऊल पुढे होता. त्याने फक्त इतकंच सांगितलं नाही, की ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत तर तो असेही म्हणाला, की सूर्य हा सुद्धा इतर तारयांसारखा एक ताराच आहे. विश्वात अनंत तारे आहेत आणि या तारयांच्या भोवती पण त्यांच्या ग्रहमाला असायला हव्यात आणि तिथे आपल्यासारखे बुद्धीमान सजीव असायला हवेत. एकूण काय तर आपण काही वेगळे नाही.
रोमन न्यायालयाने त्याच्यावर अशी अफवा पसरवण्या विरूद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवला आणी त्याच्या या पाखंडी विचार पसरवण्याच्या गुन्ह्यामुळे त्याला देहान्ताची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला जाळून मारण्यात आलं. पृथ्वी केंद्रित विश्वाच्या कल्पने विरूद्ध जाण्याचे पाप कोणी करू नये म्हणून अशी कठोर शिक्षा होती. कोपíनकसला अशा शिक्षेची पूर्ण कल्पना असल्या मुळे त्यांने स्वतहून आपले विचार स्वतच्या हयातीत प्रसिद्ध केले नव्हते.
तरीही शास्त्रज्ञ गुपचूप या विषयावर चर्चा करीतच होते. आपापल्या परीने याबद्दल आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांना सांगत होते. तसेच काहींना ही पण जाण होती की जो कोणी ग्रहांचे गणित अचूक सोडवण्यात यश मिळवेल त्याला एक प्रकारे अमरत्व प्राप्त होईल आणि इतिहासात त्याचे स्थान मोठे असेल. अशा लोकांपकी एक होता टायको ब्राहे (ळ८ूँ इ१ंँीउच्चार टीको ब्राह असा आहे पण इथे प्रचलित उच्चार वापरला आहे). हा एक डॅनिश सरदार होता. त्याची किमयागार आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून ख्याती होती. त्याने १५७३ साली खगोल पदार्थ अचल आहेत आणि त्यात काही बदल होत नाहीत हे अरिस्टॉटलचे मतआकाशात दिसलेल्या एका नव्या तारयाच्या निरिक्षणातून खोट सिद्ध केले. तर धूमकेतू हे पृथ्वीच्या वातावरणात तयार होतात या अरिस्टॉटलच्या मताला निरिक्षणांची जोड देऊन ते ही चुकीचे ठरवले आणि त्याला हे ही सांगण्यात यश आलं कही धूमकेतू चंद्राच्या पलीकडून प्रवास करतात.
आता याच संदर्भात दुसरया शतकात क्लॉडियस टॉलेमीने पृथ्वी केंद्रित विश्वाची संकल्पना मांडताना अशी कल्पना केली की पृथ्वीला एक प्रति पृथ्वी आहे. ग्रह खुद्द पृथ्वी भोवती न फिरता ते एका िबदू भोवती फिरतात. हा िबदू पृथ्वी आणि प्रती पृथ्वी या दोघांना जोडणारया रेषेच्या मध्य िबदू भोवती परिक्रमा करतो.तर टायकोचे मत होते, की सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीची परिक्रमा करतात आणि इतर ग्रह सूर्याची. यात त्याने टॉलेमी आणि कोपíनकस यांच्या सिद्दांन्ताची जोड बसवण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरीत हा एक सुरक्षित उपाय होता. या सिद्धांताला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे ग्रहांचं गणित सोडवणम आधी पेक्षा सोपं जात होत. पण चर्चने मात्र हा सिद्धांत म्हणजे हा एक असा गणितीय उपाय आहे की ज्याचा उपयोग ग्रहांच्या स्थितींचे भाकित करणे सोपे जावे म्हणून करण्यात येऊ शकतो इतकंच मान्य केलं. त्याच बरोबर सूर्यकेंद्रित विश्व हे सत्यतेच्या विरूद्ध आहे असेही सांगण्यात आले.
टायकोला हे माहीत होते की स्वतचा सिद्धांत प्रसिद्ध करून जगन्मान्य होण्याकरिता त्याला निरिक्षणांची जोड आवश्यक होती. त्या साठी त्याने स्वीडन मधील व्हेन या एका बेटावर १५७६ साली एक मोठी वेधशाळा निर्माण केली. या वेधशाळेत खगोलांच्या स्थितींची नोंद घेण्या करता अनेक उपकरणे होती. इथे आपण हे विसरता कामा नये की अजून दुर्बणिींचा शोध लागायचा होता. या वेधशाळेत जवळ जवळ ३७० लोक होते त्यातील १००विद्यार्थी आणि उपकरणे बनवण्यात तज्ञ अशी लोक होते. त्याने स्वत बनवलेल्या उपकरणांचा वापर करून तारयांचा आणि ग्रहांच्या स्थितींचा वेध घेतला होता. नंतर १५९७ मध्ये त्याला प्रागला स्थालांतर करावे लागले. प्रागमध्ये सम्राट रूडॉल्फिनन याने त्याला आश्रय दिला
जेव्हा तारयांचे आणि ग्रहांच्या स्थितींच्या निरीक्षणाचे काम टायकोने हाती घेतले तेव्हा त्याला एक गणितज्ञाची गरज होती. टायको स्वत एक निष्णात निरिक्षक होता पण आपण गणितात कमी पडत आहोत याची त्याला पूर्ण जाणीव होती. मदतीसाठी आवश्यक असलेला हा गणितज्ञ त्याला फेब्रुवारी १६०० मध्ये योहान्स केप्लर याच्या स्वरूपात भेटला. केप्लरने त्याच्या कडे दोन महिने वास्तव्य केले. या काळात केप्लरला टायकोच्या निरिक्षणाचे मोल कळले होते तर टायको केप्लरच्या गणिताने प्रभावित झाला होता. त्याची टायकोकडे नोकरी करण्याची तयारी होती पण ते काही जमलं नाही आणि केप्लरला आपल्या घरी ऑस्ट्रियातील ग्राज येथे परत जावं लागलं.
इकडे ग्राज मध्ये वेगळीच चळवळ सुरू होती. केप्लरने ग्राज मध्ये कॅथलिक पंथ स्वीकारण्यास नकार दिला जेणे करून केप्लर आणि त्याच्या परिवाराला ग्राज मधून बाहेर पडावं लागलं. तो परत प्रागमध्ये आला. त्यावेळी मात्र टायकोने त्याला आश्रय दिला. आणि स्वतने घेतलेल्या मंगळाच्या निरिक्षणाचा अभ्यास करण्यास केप्लरला सांगितले. त्याच वर्षी 24 ऑक्टोबर १६०१ रोजी टायकोचे आकस्मिक निधन झाले.जिथे टायकोचे मित्र आणि नातेवाईक त्याची संपत्ती ताब्यात घेण्यात गर्क होते, केप्लरने मात्र टायकोची सर्व निरिक्षणे आपल्या ताब्यात घेतली. पुढे या निरिक्षणांच्या मदतीने केप्लरने ग्रहांच्या गतीचे तीन नियम दिले. त्या काळी ग्रहांच्या स्थानांचे भाकित करण्याकरिता अलफोंन्सिन सारणी वापरली जायची. टायकोच्या निरिक्षणांचा उपयोग करून जी नवीन सारणी केप्लरने तयार केली त्यात जवळ जवळ दीड हजार तारयांच्या अचूक स्थितींची नोंद होती तसेच ग्रहांच्या स्थितींचे भाकित करण्यासाठी पण सारणी होती. टायकोची ही सारणी त्याच्या मृत्यूनंतर केप्लरने प्रसिद्ध केली. याला रूडॉल्फिन सारणी म्हणून ओळखण्यात येतं. ही सर्व कथा सांगण्याच कारण की आज आपण पृथ्वी सह सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात ही कल्पना अगदी सहज रित्या मान्य करतो पण अशी ही कल्पना जनसामान्यांत रूजवण्याकरिता फार मोठे प्रयत्न झाले होते. (समाप्त)
   paranjpye.arvind@gmail.com