मला लॅपटॉप घ्यायचा आहे. त्यामध्ये मला इंटेल  कोर २ डय़ुओ प्रोसेसर, बॅटरी बॅकअप, वायफाय २ जीबी रॅम आणि दहा मेगापिक्सलचा कॅमेरा हवा आहे. 

– संजय भामरे, भुसावळ 

लॅपटॉपमध्ये १० मेगापिक्सल कॅमेरा? तुमची ही मागणी खूपच हायटेक आहे. यावर बहुतांश कंपन्यांनी अद्याप विचारही केला नसेल. असो, असा कॅमेरा तुम्हाला सध्या तरी कोणत्याही ब्रॅण्डेड लॅपटॉपमध्ये इनबिल्ट उपलब्ध होणार नाही. यासाठी तुम्ही यूएसबीवर चालणारा वेगळा वेबकॅम घेऊ  शकता.  हा कॅमेरा तुम्ही तुमच्या लॅपटॉपला अटॅच करून तो वापरू शकता.  आता लॅपटॉप घ्यायचा म्हटलं तर, तुम्ही डेलची इन्पिरॉन सीरिजमधील लॅपटॉप घेऊ  शकता. यासाठी तुम्हाला तुमचे बजेट थोडे वाढवावे लागेल पण हा लॅपटॉप तुम्हाला भविष्यात कधीही चेंज करावासा वाटणार नाही. याची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला वेगळे न्युमॅरिक पॅड उपलब्ध आहे. यामुळे आपण साध्या की-बोर्डप्रमाणेच त्याच्या ऑपरेटिंगची मजा घेऊ  शकतो. याचा सीपीयू – २. २ इंटेल कोर आय ३, असून हार्ड ड्राइव्ह – ३२० जीबी, मेमरी – ३ जीबी डीडीआर २, ऑप्टिकल ड्राइव्ह – सुपर मल्टी डीव्हीडी रायटर विथ डबल लेअर सपोर्ट, ऑपरेटिंग सिस्टीम – विंडोज ७ होम बेसिक आदी सोयी आहेत.  याचबरोबर वेबकॅम, मेमरीकार्ड रीडर, ब्ल्यूटय़ूथ, वाय-फाय याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. जास्त मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासाठी तुम्हाला मिनी लॅपटॉपचा पर्याय आहे, मात्र त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिग्रेशन अगदी बेसिक मिळतं, आणि ते लॅपटॉप अर्थात नेटबुक वापरण्यासही त्रासदायक असतात.

माझ्या घरी सातत्याने फ्लक्चुएशन होत असतं.  ही समस्या आमच्या संपूर्ण परिसरात आहे. यामुळे माझ्या संगणकावर परिणाम होतो. मी जर यूपीएस वापरला तर माझी ही समस्या सुटेल का?

– जयेश मगरे, रत्नागिरी</strong>

फ्लक्चुएशनच्या समस्येसाठी यूपीएस हे सोल्युशन नसले, तरी संगणकामधील डेटा सेव्ह राहण्यासाठी तसेच संगणक एकदम बंद पडू नये यासाठी तुम्ही यूपीएसचा वापर नक्कीच करू शकता.  तुमच्या घरातील वीजप्रवाहाचा वेग अमुक एका पातळीपेक्षा कमी झाला की, तातडीने तुमचा यूपीएस काम करण्यास सुरुवात करतो. यामुळे तुमचा संगणक किमान बंद तरी होणार नाही. तसेच तुमच्या संगणकामधील डेटा चांगल्याप्रकारे सेव्ह राहू शकतो.  मात्र यूपीएस सुरू झाल्यानंतर तुम्हाला संगणक  शटडाऊन करावा लागणार. यामुळे तुमचा यूपीएसचा वापर केवळ संगणकामधील डेटा स्टोअरेज आणि डिस्टचेकिंग होऊ  नये यासाठी होऊ  शकतो. सध्या बाजारात लोकल मार्केटपासून ते ब्रॅण्डेड यूपीएस उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही आयबीएमच्या यूपीएसचा विचार करू शकता. सर्व यूपीएसची किंमत १२०० पासून ते २५०० रुपयांपर्यंत आहे. मात्र तुमच्या फ्लक्चुएशन समस्येचा फरक मॉनिटरवर पडू शकतो.  यामुळे मॉनिटरची टय़ुब खराब होऊ  शकते. युवराज तुम्ही यासाठी फ्लक्चुएशनची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.