वालीव पोलिसांकडून मुलाची सुखरूप सुटका; ‘क्राइम पॅट्रोल’ पाहून गुन्हय़ाची योजना
वसई येथून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याची वालीव पोलिसांनी उत्तर प्रदेशातून सुखरूप सुटका केलीे आहे. शेजारी राहणाऱ्या दोन मुलांनी ३ लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण केले होते. क्राइम पॅट्रोल ही गुन्हेविषयक काम पाहून त्यांनी अपहरणाची ही योजना बनवली होती. परंतु वालीव पोलिसांनी तत्परतेने तपास लावून त्यांचीे योजना उधळून लावली
रामकुमार चौरसिया (२५) हा रिक्षाचालक पत्नी आणि दोन लहान मुलांसह वसई पूर्वेच्या धानिव बागमधील कृष्णा नगर येथे एका चाळीत राहतो. २५ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रतीक बेपत्ता झाला होता. दिवसभर शोध घेऊनही तो सापडला नव्हता. संध्याकाळी चौरसिया यांनी वालीेव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौरसिया यांचीे आर्थिक परिस्थितीे अत्यंत प्रतिकूल होती. त्यांचे कुणाशीे वैर नव्हते. त्यामुळे प्रतीकचे अपहरण कुणीे आणि का केले हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे होता.
.. तर्कावरून सुगावा
कसलाही दुवा नसल्याने पोलीस चक्रावले होते. त्यामुळे वालीेव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मरकड आणि त्यांच्या पथकाने परिसरातील रहिवाशांकडे चौकशीे सुरू केलीे. त्यांच्या घराजवळ राहत असलेल्या १६ वर्षीय असलम (नाव बदलेले) या मुलाचे वागणे संशयास्पद वाटले. त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी मग त्याची सखोल चौकशी करून बोलते केले. पोलिसांच्या सरबत्तीपुढे असलम नमला आणि त्याने प्रतीकचे अपहरण केल्याची कबुली दिली. चौरसिया यांच्या शेजारी राहणारा गणेश बिंद (१९) हा या अपहरणाच्या कटातीेल मुख्य सूत्रधार होता. असलमने घराबाहेर खेळणाऱ्या प्रतीकला पळवून गणेशकडे दिले. गणेश त्याच रात्री त्या मुलाला घेऊन उत्तर प्रदेशातीेल जौनपूर येथे रवाना झाला होता. मुलाला इजा होण्याचा धोका होता. वालीव पोलिसांनी लगेच जौनपूरच्या फूलपूर गावातीेल पोलीस आणि सरपंचाला आरोपी गणेश तसेच मुलाचा फोटो पाठवून दिला. गणेश गावात येताच सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी गणेशला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. तोपर्यंत वाली व पोलिसांचे पथकही पोहोचले होते. त्यांनी गणेशला स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर मुंबईला आणले.
या अपहरणाबाबत माहितीे देताना साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मरकड यांनी सांगितले की, गणेशने शाळा सोडलीे असून तो मोबाइल दुरुस्तीेचे काम करतो. त्याला मोबाइल दुरुस्तीचे दुकान सुरू करायचे होते. त्यासाठी त्याला तीन लाख रुपयांची गरज होती दिवसभर तो क्राइम पॅट्रोल बघत असायचा. त्यावरून त्याला अपहरणाचीे कल्पना सुचली आणि त्याने आपल्यासोबत असलमला घेतले. उत्तर प्रदेशात जाऊन तेथून प्रतीकचे वडील चौरसिया यांना फोन करून तीन लाखांची खंडणी मागायची त्यांची योजना होतीे. पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना पकडले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मरकड, शंकर उथळे, मधुकर आरुडे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे आदींच्या पथकाने तपास करून बाळाची सुखरूप सुटका केली. गणेशची रवानगी पोलीस कोठडीत तर असलम अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.