तिघांना अटक; आठ जण फरारी

ठाणे येथील मानपाडा भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलेला रुग्ण मृत पावला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले म्हणून संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. या घटनेत मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि पोलिसांना मारहाण करत त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी शुक्रवारी चितळसर मानपाडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आठ आरोपी अजूनही फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

vasai police beaten up
वसई: पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण, पोलिसाचा तुटला दात
through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

कापुरबावडी येथील अमराई झोपडपट्टी भागात राहणारे वासु बेलगिरे यांची गुरुवारी रात्री प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना मानपाडय़ातील टायटन रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून ते मृत पावले असल्याचे घोषित केले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील दोन दरवाजांच्या काचा हाताने फोडून डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकाराबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या चितळसर मानपाडा पोलिसांनी रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस नातेवाईकांनी पोलिसांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली असून यामध्ये पोलीस जखमी झालेले नाहीत. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बाबा पांडुरंग वाघमारे (३०), सागर आसाराम गरगडे (२३) आणि साईराम आसाराम गरगडे (२४) या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही कापुरबावडी येथील अमराई झोपडपट्टी परिसरात राहत असून ते मृताचे नातेवाईक आहेत. या प्रकरणात आठ आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.