वसईतील शाळांमध्ये ‘स्ट्रॉबेरी क्वीक’चा सर्रास पुरवठा; पालक धास्तावले, पोलिसांची उपाययोजनांसाठी बैठक

वसई-विरारमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थाचे लोण पसरलेले असतानाच आता त्यात आइस्क्रीमच्या स्वरूपात मिळणाऱ्या अमली पदार्थाची भर पडली आहे. वसई-विरारमधील अनेक शाळांमध्ये या प्रकारच्या अमली पदार्थाचा पुरवठा केला जात असून या प्रकारामुळे शाळांसह विद्यार्थ्यांचे पालकही धास्तावले आहेत. वसईतील एका शाळेने याबाबत सतर्क करणारे फलकही लावले आहेत. अमली पदार्थाचा हा नवीन धोका रोखण्यासाठी वसईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपाययोजनांसाठी बैठक घेतली आहे. शहराला अमली पदार्थाचा विळखा पडला असतानाही शहरात अद्याप अमली पदार्थविरोधी सेल स्थापन झाला नसल्याचेही समोर आले आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
ipl 2024 lsg vs csk match noise levels peak as ms dhoni walks out to bat in lucknow ekana stadium quinton de kock wife shares photo
धोनीच्या एन्ट्रीनंतरचा स्टेडियममधील ‘तो’ माहोल प्रेक्षकांसाठी ठरू शकतो घातक! क्विंटन डिकॉकच्या पत्नीने पोस्ट केला PHOTO
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

वसई-विरार शहरात अमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अनेक शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. आता अमली पदार्थ आइस्क्रीमच्या स्वरूपात दाखल झाले असून शाळकरी मुलांना लक्ष्य करून शाळेच्या आवारात त्याची विक्री करण्यात येत आहे.

‘स्ट्रॉबेरी क्वीक’ नावाचा अमली पदार्थ आइस्क्रीममध्ये मिसळून त्याची विक्री केली जात आहे. हे अमली पदार्थ आहे याची सुरुवातीला कल्पना येत नाही. मात्र नंतर त्याचे व्यसन जडते. मुले या आइस्क्रीमच्या आहारी जातात आणि त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात. वसईतील एका शाळेने याबाबत पालक व विद्यार्थ्यांना सूचना देणारे फलक लावले असून, विद्यार्थ्यांमध्ये

जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

शहरात अमली पदार्थविरोधी कक्षच नाही

वाडा तालुक्यात मे महिन्यामध्ये ४५० किलो मँड्रिक्स या अमली पदार्थाचा मोठा साठा आढळला होता. पालघर जिल्ह्यची स्थापना झाल्यापासून अनेक कक्ष अद्यप सुरू झाले नाहीत. अमली पदार्थविरोधी विभाग हा सगळ्याच प्रमुख विभाग मानला जातो. मात्र अद्याप पालघर जिल्ह्यत तो सुरू झालेला नाही. पालघर स्थानिक गुन्हे शाखा अमली पदार्थविरोधी कारवाया करते. वाडय़ातील अमली पदार्थाचा साठाही पालघर स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता. स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात गांभीर्याने कारवाई केली नसल्याने अमली पदार्थाचे तस्कर वसईत सक्रीय झाले आहे. मुंबईच्या अमली पदार्थविरोधी शाखेने वसईतून अनेक अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना अटक केली होती.

काय आहे स्ट्रॉबेरी क्वीक?

* स्ट्रॉबेरी क्वीक हा मूळचा दक्षिण आफ्रिकेतील अमली पदार्थ आहे. भारतात गेल्या वर्षी तो आल्याची चर्चा आहे.

* लालसर रंगाचा हा अमली पदार्थ चवीला गोड असतो. आइस्क्रीममधील रंगात ते मिसळले जाते.

* शाळकरी मुलांना अमली पदार्थाच्या आहारी ओढण्यासाठी त्याचा वापर होतो.

पालक धास्तावले

शाळेच्या आवारात अमली पदार्थ मिळत असल्याचे समजल्यानंतर पालक धास्तावले आहेत. ‘आम्ही शाळेत मुलांना पाठवल्यावर दिवसभर काय करतात ते पाहू शकत नाही. पण शाळेतच जर अशा प्रकारचे अमली पदार्थ मिळत असतील तर पोलीस आणि शाळा व्यवस्थापनाने ते रोखण्यासाठी उपाययोजना करायला हवी,’ असे एका पालकाने सांगितले.