‘खाशील तसा होशील’ किंवा ‘चांगले खावे-स्वस्थ राहावे’ अशा म्हणी आपल्याकडे प्रचलित आहेत. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. प्रांतागणिक भाषा, चालीरीती आणि पोशाखांप्रमाणेच खाद्यसंस्कृतीही बदलते. ‘ऋतुकालोद्भव’ आरोग्यास हितकारी असे आपल्या पूर्वजांनी सांगितले असले तरी आता आपल्या नेहमीच्या आहाराबरोबरच इतर प्रांतांतील खाद्यपदार्थही रुचिपालट म्हणून आवर्जून खाल्ले जाऊ लागले आहेत. ठाण्यात देशी-विदेशी अनेक खाद्यपदार्थ आता उपलब्ध आहेत. मोमोज, चिकन शॉर्मा, दाल बाटी, पापड चुरी, नान सॅण्डविच ही त्यातलीच काही ठळक उदाहरणे.

विविध प्रकारचे मोमोज आणि चिकन शॉर्मा मिळणारे ‘फ्रेश मोमोज अ‍ॅण्ड साहिल चिकन शोर्मा कॉर्नर’ ठाण्यात सध्या लोकप्रिय होत आहे. पाच महिन्यांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तन्वीर कुरेशी आणि कलीम कुरेशी यांनी ‘फ्रेश मोमोज अ‍ॅण्ड साहिल चिकन शॉर्मा कॉर्नर’ सुरू केले आहे. अस्सल मोगलाई पद्धतीच्या चिकनची चव येथे ठाणेकरांना चाखता येते. पुन्हा येथील दरही खिशाला परवडणारे आहेत.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

नावाप्रमाणेच इथे आपल्याला चिकन आणि व्हेज मोमोज चिकन शॉर्मा, इडली पोहा यांसारखे नाश्त्याचे पदार्थ आणि तब्ब्ल २७ विविध प्रकारच्या ज्यूसची चव चाखायला मिळते. मोमोज् हा सध्याचा तरुणाईचा आवडता पदार्थ. कॉलेज कॅन्टीनपासून ते शहरातील विविध कॉर्नर्समध्ये आपल्याला हमखास विविध प्रकारच्या मोमोज्ची चव चाखायला मिळते. मोमोज् हा खरे तर मूळ तिबेटियन पदार्थ. तेथील डोंगराळ भागात लोकप्रिय असलेला. आपल्या मोदकांसारखा दिसणारा. त्यालाही मोदकाप्रमाणेच उकड काढावी लागते. मात्र चवीच्या बाबतीत मात्र अतिशय वेगळा. वाफाळलेले गरमागरम शाकाहारी-मांसाहारी मोमोज् आता तरुणाईला आवडू लागले आहेत. त्यामुळे आता सकाळ-संध्याकाळच्या छोटय़ा पोटपूजेसाठी तरुणाई वडा-समोशापेक्षा मोमोज्ला प्राधान्य देऊ लागली आहे. कोबी, चीज,बटर, गाजर, कांदा, आलं-लसूण पेस्ट, मीठ-मसाला टाकून केलेले सिम्पली व्हेज मोमोज, पनीर, कोबी, गाजर, कांदा, आलं-लसूण पेस्ट,मीठ आणि मसाला टाकून केलेले पनीर मोमोज, व्हेज चीज मोमोज, चिकन खिमा, सोया सॉस, आलं-लसूण पेस्ट यांच मिश्रण करून तयार केलेलं चिकन मोमोज, तिखट चव असलेले चिकन चिली मोमोज आणि चिकन स्पेशल मोमोजची चव आपल्याला इथे चाखता येते.

चिकन शॉर्मा हे या कॉर्नरचे खास वैशिष्टय़. खरं तर शॉर्मा हा दोन प्रकारे तयार केला जातो. एक म्हणजे खबुस (शॉर्माची रोटी) वर चिकन टाकून किंवा पावामध्ये चिकन टाकून. यामुळे खाद्यप्रेमींना आपल्या सोयीनुसार रोल किंवा हॉट डॉगसारख्या पावामध्ये शॉर्माचा स्वाद घेता येतो. चिकनला शेगडीवर रोस्ट करून त्यात मेयॉनीज, शॉर्मा स्पेशल चटणी, कोबी, बिट शेकवलेल्या खबुस किंवा पावावर टाकून चिकन शॉर्मा तयार केला जातो.

सध्याच्या या कडक उन्हाळ्यात घशाला थंडावा देण्यासाठी आपण सरबत किंवा विविध प्रकारच्या फळांच्या रसाच्या शोधात असतोच. इथेही आपल्याला फळांच्या आणि भाज्यांच्या एकूण २७ प्रकारच्या ज्यूस आणि मिल्कशेकचा आस्वाद घेता येतो. इथे मँगो, कॉकटेल, पपई, अंजीर, सीताफळ यांसारख्या दररोजच्या फळांबरोबरच केळे, खजूर, मिल्कशेक, चोकोशेक यांसारखे मिल्कशेकही मिळतात. विविध फळांच्या रसाची चव तर आपण सर्वत्रच चाखतो, परंतु इथे फळांच्या रसाबरोबरच आपल्याला दुधी, कारले, गाजर-बिटसारख्या भाज्यांबरोबरच गाजर, बिट, आलं, पुदिना, आवळा, लिंबाचे मिश्रण करून तयार केलेला आगळ्यावेगळ्या असा मिश्र भाज्यांचे ज्यूसही इथे उपलब्ध आहे. त्यात कुरेशी बंधू हे सर्व जिन्नस अतिशय आगत्याने देत असल्याने दोन घास अधिक खाल्ले जातात.

पत्ता- फ्रेश मोमोज अँड साहिल चिकन शोर्मा कॉर्नर, शॉप नं.५, रत्नमणी अपार्टमेंट, दादा पाटील वाडी,रेल्वे स्थानकाजवळ,ठाणे (प.)