कल्याण-डोंबिवली महापालिका क्रीडासंकुल, डोंबिवली (पूर्व)

दैनंदिन जीवनात प्रत्येकाला दररोज पोटासाठी आणि पर्यायाने पैशासाठी धावावे लागत असले तरी स्वत:चे आरोग्य राखण्यासाठी काहीकाळ चालावेही लागते. डोंबिवली शहरात पूर्वेकडे मॉर्निग वॉक करण्यासाठी क्रीडासंकुल हे एक मोठे ठिकाण आहे. सकाळ-संध्याकाळी येथे अनेक डोंबिवलीकर नियमितपणे व्यायाम करताना दिसतात.

sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

डोंबिवली शहरात फारशी मैदाने अथवा उद्याने नाहीत. त्यामुळे सकाळी फेरफटका अथवा व्यायाम करण्यासाठी खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. शहराच्या पूर्वेकडील वेशीवर असणारे क्रीडासंकुल हे सर्वात मोठे ठिकाण. या मैदानाभोवती पालिका प्रशासनाने नागरिकांना चालण्यासाठी पदपथ तयार केला आहे. बसण्यासाठी येथे ठिकठिकाणी कट्टेही आहेत, मात्र देखभाल दुरुस्तीअभावी या संकुलाची सध्या पार रया गेली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने इथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. भटकी कुत्री संकुलात फिरत असतात. ती जागोजागी घाण करून ठेवतात. पहाटे येथे फिरायला येणाऱ्यांच्या अंगावर ती धावूनही जातात. या मोठय़ा मैदानात फारशी झाडे नाहीत. त्यामुळे हा परिसर उजाड आणि भकास वाटतो. पदपथावर प्लेव्हर ब्लॉक बसविल्याने चालणे सुसह्य़ होते, इतकेच. बाकी सुविधांविषयी मात्र आनंदच आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासनाच्या ते गावीही नसावे. कारण एवढे मोठे क्रीडासंकुल असूनही इथे शौचालयाची सोय नाही. पिण्याचे पाणीही महापालिका प्रशासन उपलब्ध करून देऊ शकलेली नाही.

या साऱ्या असुविधांकडे कानाडोळा करून शेकडो नागरिक येथे व्यायाम करायला येतात. महापालिका प्रशासनाने किमान काही सुविधा द्याव्यात, इतकीच नागरिकांची अपेक्षा आहे.

क्रीडासंकुल हे मूलत: मोठे मैदान आहे. तिथे शहरातील अनेक हौशी क्रिकेटपटू खेळायला येतात, मात्र सर्वत्र प्रचलित असणारी ‘ओपन जीम’ची सुविधा इथे नाही. त्यामुळे लवकरात लवकर येथे व्यायामाची साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

या संपूर्ण परिसरात एकही निवारा शेड नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथे नागरिकांचे हाल होतात. महापालिका प्रशासनाने शेड उभारावी, असेही काहींचे म्हणणे आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पालिकेच्या मालकीच्या या जागेत रात्री-अपरात्री दारूच्या पाटर्य़ा होतात. बाटल्यांचा पडलेला खच हा त्याचा पुरावा आहे. सुरक्षारक्षक नेमून अशा तळीरामांचा बंदोबस्त करावा लागेल.

स्वच्छता आणि निगा राखावी.

उद्यानात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. मैदानात ठिकठिकाणी कचरा पडलेला आढळतो. त्या कचऱ्यात दारूच्या बाटल्याही असतात. त्यामुळे क्रीडासंकुलाची पार रया गेली आहे. अरुणकुमार चौहान

 

सुविधांची वानवा

आम्ही इथे नियमित व्यायाम करायला येत आहोत. मात्र इथे झाडे नसल्याने परिसर भकास वाटतो. सुविधांच्या नावाने बोंबच आहे.पिण्याचे पाणी नाही. बसण्यासाठी बाकडी नाहीत. – सनअली प्रेसवाला

निवारा शेड हवी

किमान सुविधांसाठी नागरिकांनी प्रशासनाकडे मागण्या केल्या, मात्र अजूनही असुविधा कायम आहेत. पावसाळ्यासाठी तरी इथे निवारा शेडची आवश्यकता आहे.  – आशालता कांबळे

कचरा दूर करावा

सकाळी फिरायला येताना शुद्ध, मोकळी हवा मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र क्रीडा संकुल परिसरात झाडेच नाहीत.  ठिकठिकाणी कचरा पडलेला असतो. त्यामुळे निराशाच पदरी पडते. – अनिल चौधरी