ज्ञानसाधना महाविद्यालयालगत उन्नत स्वरूपाची उभारणी; रेल्वे प्रशासनाचा सविस्तर प्रस्ताव न्यायालयात सादर
ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीवर उतारा शोधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयालगत उन्नत रेल्वे स्थानक उभारणीचा निर्णय जवळपास पक्का करत आणला आहे. मुंबई उच्च न्यायालयात रेल्वे अपघातासंबंधी सादर करण्यात आलेल्या एका अहवालात रेल्वे प्रशासनाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार पूर्व द्रुतगती महामार्गाला समांतर असलेल्या सेवा रस्त्यावर तीन हात नाका येथील उड्डाणपुलापासून काही अंतरावर हे उन्नत स्थानक उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. या नव्या स्थानकाच्या उभारणीसाठी कोपरी येथील मनोरुग्णालय परिसरातील सुमारे आठ हेक्टर जागेची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे सहा लाख प्रवासी येजा करत असतात. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांची लोकसंख्या एव्हाना २० लाखांच्या पलीकडे पोहचली असून घोडबंदर मार्गालगत उभ्या राहणाऱ्या संकुलांमुळे नागरीकरणाचा वेग भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे आहेत. या वाढत्या लोकसंख्येसाठी ठाण्याला पर्यायी स्थानक असावे, असा प्रस्ताव मध्यंतरी मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने पुढे आणला होता. त्यानुसार ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक उभारण्याचे ठरले. यासंबंधीची आखणीही करण्यात आली. मात्र मनोरुग्णालयाची जागा राज्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असल्याने जमिनीच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत आला. मनोरुग्णालयाच्या ७२ एकर जागेपैकी बराचशा जागेवर अतिक्रमणे आहेत. ती हटवावीत आणि त्यावर स्थानकाची उभारणी केली जावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारपुढे पाठविला आहे. मात्र जागेच्या हस्तांतरणाचे घोंगडे भिजत पडल्याने हे विस्तारित स्थानक नेमके कुठे उभारले जाणार याविषयी संभ्रम कायम होता.
उन्नत स्थानकाचा प्रस्ताव
दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातासंबंधी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवर प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नव्या विस्तारित स्थानकाचा सविस्तर आराखडा तयार केला असून, त्यानुसार पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ उन्नत स्वरूपात हे स्थानक उभारले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

* महामार्गावरून ज्ञानसाधना महामार्गाकडे जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या पादचारी पुलापासून तीन हात नाका येथील उड्डाणपुलापर्यंत असलेल्या सेवा रस्त्यावर उन्नत स्वरूपाचे हे स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे.
* सीएसटीहून ठाण्याकडे येणारी लोकल मुलुंड स्थानकातून या विस्तारित स्थानकात येईल, असेही मध्य रेल्वेच्या अहवालात म्हटले आहे.
* या स्थानकाची उभारणी होत असताना मनोरुग्णालयाची जागा हस्तांतरित झाल्यास तेथे बस, मेट्रो आणि रेल्वेचे एकत्रित टर्मिनल उभारण्याचा विचार केला जाणार आहे.

Unauthorized hoardings, Mahabaleshwar,
अनधिकृत जाहिरात फलकांची महाबळेश्वर पाचगणी पर्यटन स्थळाच्या मार्गावर घुसखोरी
Course, Temple Management,
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम, जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
mumbai shivdi worli Road marathi news, shivdi worli Road marathi news
मुंबई: शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे ६५ टक्के काम पूर्ण, पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार
bus, Nagpur-Tuljapur National Highway,
एसटी बस दरीत कोसळता कोसळता वाचली! नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
baobab tree, angry environmentalists,
३०० वर्ष जुन्या बाओबाब झाडाची कत्तल, संतप्त पर्यावरणप्रेमी उद्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार
Vande Bharat, Tejas,
कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश
Mumbai, Patrachal Redevelopment Project, Siddharth Nagar, Set for Completion, by May, Patrachal case, goregaon, Patrachal news, goregaon news, mumbai news, marathi news,
पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतीचे ८५ टक्के काम पूर्ण, मेअखेरीस काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन
palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प