रमेदी माता चर्च, रमेदी

दक्षिण वसईचे हृदयस्थान असलेले रमेदी येथील ‘रमेदी माता चर्च’ अतिशय देखणे आहे. भव्य आणि दिमाखदार उभी असलेली चर्च इमारत अतिशय सुंदर असून १६व्या शतकातील या चर्चबद्दल वसईकरांच्या मनात पूर्वापार विशेष जिव्हाळा आहे.

candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
Fire in BJP Office
मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट
Longest railway station name in India
‘हे’ आहे भारतातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक; वाचताना तुम्हीही अडखळाल, एकदा प्रयत्न करुन पाहाच!
Mumbai is to be developed as a single whole city Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
मुंबई एकच, संपूर्ण शहराचा विकास करायचा आहे; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल

रमेदी चर्चचा इतिहास हा सांडोर व पापडी याप्रमाणे पुरातन आहे. पापडी व रमेदी ही दोन्ही चर्च सांडोर चर्चपासून विभक्त करण्यात आली आहेत. रमेदी येथील चर्च हे डॉमिनिकन फादर यांनी बांधले. १५६४ मध्ये डॉमिनिकन फादर वसई किल्ल्यात आले. ज्या ठिकाणी आज चिमाजी आप्पांचे स्मारक आहे, त्याच्या अगदी समोर त्यांचे निवासस्थान आणि भव्यदिव्य शिक्षणसंस्था होती. १२ वर्षे वसई किल्ल्यात घालवल्यानंतर १५७६ मध्ये स्थानिक लोकांच्या सोयीसाठी त्यांनी किल्ल्यापासून दोन तोफ गोळ्याच्या अंतरावर रमेदी येथे चर्च उभे केले. ते नक्की कुणी बांधले हे सांगता येत नसले तरी या चर्चला सुरुवातीच्या काळात फा. लोबो कारदोजो हे एक अग्रगण्य धर्मगुरू लाभले. डॉना आना ऑर्तीझ या एका राजेशाही घराण्यातील महिलेच्या भरघोस देणगीचा मोठा उपयोग हे चर्च बांधण्यात झाला. धवळी या गावात हे चर्च असले तरी माऊलीच्या नावावरून या संपूर्ण परिसराला रमेदी हे नाव प्राप्त झाले.

१६७९मध्ये अरब चाच्यांनी दक्षिण वसईवर हल्ला चढवला. पापडी व सांडोर ही चर्चेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र रमेदी चर्च हे त्यातून वाचले गेले. मात्र १६९०मध्ये काकाजी यांनी या चर्चवर हल्ला चढवल्याचे इतिहास म्हणतो.

जून महिन्याच्या दर शनिवारी उत्तर वसईतील भाविक मंडळी वाजंत्री घेऊन बैलगाडीने या चर्चकडे येत. दिवसभरात दक्षिण वसईतील एखाद्या ओळखीच्या घरी भोजन उरकून ही मंडळी संध्याकाळी पुन्हा गावी परतत. या लोकांच्या बोलीभाषेत ‘रमेदाये आये’ हे एक प्रख्यात लोकगीत पूर्वापार रमेदी माऊलीचे थोरवी गात आले आहे. ख्रिस्ती बांधव जसे पूर्वापार रमेदीला जात, तसे ते वांद्रे येथे मोतमाऊलीच्या चर्चमध्येही जात. परंतु १९९८ मध्ये वसई धर्मप्रांत मुंबईपासून अलिप्त झाला, तेव्हापासून रमेदीचे भक्तीस्थान हे ‘धर्मप्रांतीय भक्तीस्थान’ म्हणून गणले जाऊ  लागले. चर्चच्या प्रांगणात माऊलीची नवीन मूर्ती उभारण्यात आली. या चर्चमध्ये असलेली प्रमुख वेदी भुलेश्वर चर्चमधील होती. भुलेश्वर चर्च हे मुंबईतील बाजारपेठेमध्ये असल्याने भक्तगणांना चर्चमध्ये जाणे अवघड वाटू लागले. १९४१मध्ये भुलेश्वर चर्च बंद करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आणि तेथील वेदी रमेदीला मिळाली.

नवे रूप

६० वर्षांपूर्वी एका भक्ताने चर्चमध्ये लावलेल्या मेणबत्तीमुळे लाकडी वेदीने पेट घेतला. फादर सबेस्टीन वाझ या तडफदार धर्मगुरूंची या चर्चमध्ये नेमणूक करण्यात आली. त्यांनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने या चर्चची मोठय़ा प्रमाणात डागडुजी केली. आज रमेदी चर्चने एक नवे रूप धारण केले आहे. त्यामुळे ही संपूर्ण वास्तू सर्वाचे लक्ष वेधून घेते. या धर्मग्रामात ११७३ कुटुंबे असून तेथील एकूण कॅथॉलिक लोकांची संख्या ३८७४ आहे.

५३ बावखलांचे वरदान

रमेदी चर्च हे दक्षिण वसईचे हृदयस्थान आहे. या गावाला परमेश्वराने गोडय़ा पाण्याच्या ५३ बावखलांचे वरदान दिले आहे. या हृदयात जर गोडे पाणी मोठय़ा प्रमाणात असले, तर संपूर्ण दक्षिण वसईला गोडे पाणी मिळेल या उदात्त भावनेने त्यांनी या बावखलची खोदाई करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.