आपल्या व्यग्र जीवनशैलीत व्यायाम आणि उत्तम आरोग्याचे महत्त्व आपल्याला हळूहळू पटू लागले आहे. त्यामुळे जस जसा वेळ मिळेल तसे अनेक जण दहा पंधरा मिनिटांसाठी का होईना धावण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी थेट जीम गाठतात. पण अनेकांना व्यायाम करताना कानात इअरफोन लावून गाणी ऐकण्याची किंवा फोनवर बोलत व्यायाम करण्याची सवय असते. तुम्हालाही अशा सवयी असतील तर या सवयी तातडीने बदला. कारण व्यायाम करत असताना गाणी ऐकणे, फोनवर बोलणे किंवा चॅटींग करणे धोकादायक ठरू शकते.

वाचा : शनीची साडेसाती नव्हे, तर ‘या’ कारणांमुळे नखांवर येतात पांढरे डाग

वाचा : दातांच्या आकारावरून ओळखा स्वभाव

धावताना किंवा जीममध्ये इतर काही व्यायामाचे प्रकार करताना अनेक जण कानात इअरफोन किंवा हेडफोन लावून गाणी ऐकणे पसंत करतात. पण तुमच्या शरीराला व्यायाम करण्याचा फायदा हवा असेल तर मात्र तुम्हाला ही सवय तातडीने बदलावी लागेल. नुकतेच अमेरिकन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणारे मायकल रिबोल्ड यांनी एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार व्यायाम करताना फोनवर चॅटिंग करणे किंवा गाणी ऐकणे हे शरीरावर नकारात्मक परिणाम टाकू शकतात.

वाचा : रात्री ‘हे’ पदार्थ खाणे आवर्जुन टाळा

वाचा : जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

व्यायाम करत असताना, व्यायामवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते तरच त्याचा फायदा शरीराला होऊ शकतो. पण व्यायाम करत असताना मोबाईल फोनमध्ये लक्ष दिले की तुमचे मन दोन भागात विभागले जाते आणि तुम्ही कोणत्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाही. अशा वेळी व्यायामाचे शरीराला मिळणारे फायदे हे जवळजवळ तुम्ही घेतलेल्या मेहनतीच्याही कमी असतात. त्यामुळे व्यायाम करताना मोबाईल फोन वापरणे तोट्याचे ठरू शकते असे या अहवालात म्हटले आहे.

वाचा : ग्रीन टी बनवताना ‘या’ चुका करू नका

वाचा : एक ग्लास पुदिन्याच्या पाण्याचा असाही फायदा

(टीप : ही बातमी अमेरिकन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणारे मायकल रिबोल्ड यांच्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. )