धाकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ अपुरा पडतो. अशात पुरेशी झोप मिळणे तसे अवघडच. अनेक जण रात्रपाळीत काम करतात किंवा कामाचे स्वरूपच असे असते ज्यामुळे झोप कमी मिळते. पण, कमी झोपेमुळे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो आणि यामुळे सर्वात जास्त धोका हा हृदयाला असतो.

वाचा : जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

नुकतेच जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचा एक अहवाल समोर आला. हृदय आकुंचन पावणे, रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा अनेक समस्या अपू-या झोपेमुळे उद्धभवू शकतात असे या अहवालात म्हटले आहे. २४ तास काम करणा-या डॉक्टर आणि काही व्यक्तींवर यांनी संशोधन केले. यामध्ये ३१ वर्ष वयोगटातील २० रेडिओलॉजिस्टचा समावेश होता. त्यांना २४ तासांची शिफ्ट करावी लागते. यामध्ये त्यांना तीन ते चार तासांची अपुरी झोप मिळते. यात संशोधकांनी त्यांच्या पूर्ण व्यस्त जीवनशैलीचा अभ्यास केला असून याचा हृदयावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. अशांचे हृदय आकुंचन पावत असून त्यांचा रक्तदाब वाढतो असेही निष्पन्न झाले आहे. यामुळे हृदयाचे ठोके देखील जलद गतीने वाढतात असेही म्हटले आहे म्हणूनच, पुरेशी आणि शांत झोप ही हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे आणखी एका संशोधनात झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबतही सांगितले आहे. अनेकांना कामामुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे कमी वेळात शांत झोप लागावी यासाठी काही गोष्टींचा विचार करण्यातबाबातही सांगण्यात आले आहे.

वाचा : उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो

झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार कराल
* दिवसभरात तुमच्या सोबत चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात पण झोपण्यापूर्वी वाईट गोष्टींचा सतत विचार करून नकारात्मक उर्जा स्वत:मध्ये भरण्यापेक्षा ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्याचा विचार करा. असे केल्याने नेहमी सकारात्मक विचार करण्याची चांगली सवय तुम्हाला लागेल. ज्या नकारात्मक गोष्टींमुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत आहे त्या नकारात्म गोष्टी बाजूला सरतील त्यामुळे झोपताना चांगल्या गोष्टींचा विचार नक्की करा.
* त्याचबरोबर झोपताना नेहमी उद्या काय कराल याचा विचार नक्की करा. नेहमी झोपताना आपल्या ध्येय धोरणाचा विचार करा.
* आजच्या पेक्षा उद्याचा दिवस कसा चांगला जाईल या गोष्टीचा विचार करा.
* नेहमी आपण आपल्यावर टीका करणा-या माणसांचा विचार करतो पण अशा व्यक्तींचा विचार करण्यापेक्षा आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना आठवून झोपावे. चांगली झोप लागते.
* उद्याच्या दिवसाची सुरूवात मी सकारात्मक विचाराने करणार हा सकारात्मक विचार मनात ठेवून झोपावे.
* झोपताना शक्य तो चांगला सुविचार, चांगले पुस्तक वाचून झोपी जावे सकारात्मक प्रेरणा मिळते.