खेळण्या-बागडण्याच्या आणि मौजमजा करण्याच्या वयात एखादा लहान मुलगा लाखो रूपये कमावतो, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. काहींना ही अतिशयोक्तीही वाटले. मात्र, कोचीत राहणारा सहा वर्षांचा निहाल राज हा मुलगा खरोखरच लाखो रूपये कमावतो. तो प्रसिद्ध युट्यूबर आणि शेफदेखील आहे.

काही महिन्यांपूर्वी निहाल प्रचंड चर्चेत आला होता. हा छोटा शेफ वेगवेगळे पदार्थ तयार करतो. त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याच्या पाककौशल्यानं आंतरराष्ट्रीय मीडियामध्येदेखील निहालचं नाव चर्चेत होतं. निहाल फक्त सहा वर्षांचा आहे. लहानपणापासून आपल्या आईला स्वयंपाक घरात चविष्ट पदार्थ तयार करताना त्याने पाहिले आणि तेव्हापासून तोदेखील आईला जेवण करण्यासाठी मदत करू लागला. हळूहळू निहालच्या मनात स्वयंपाकाविषयी अधिक आवड निर्माण झाली. सुरूवातील निहालने साध्या रेसिपीज करून पाहिल्या.

Viral Video : धक्कादायक! ‘हा’ व्हिडिओ पाहून विकृत माणसाची तुम्हाला चीड येईल

निहालच्या वडिलांनी त्याचा व्हिडिओ तयार करून तो आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला. निहालच्या कौशल्याचं मित्रपरिवार, नातेवाईकांकडून खूप कौतुक झालं. २०१५ मध्ये निहालच्या वडिलांनी युटयूब चॅनेल सुरू केलं. या युट्यूब चॅनेलला प्रेक्षकांची मोठा प्रतिसाद मिळाला. निहालचे व्हिडिओ फेसबुकवरही शेअर केले जातात. यातून तो दरमहा लाखो रुपये कमावतो. निहालने काही महिन्यांपूर्वी आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी शेअर केली होती. ती खूपच प्रसिद्ध झाली आणि या रेसिपीसाठी फेसबुकने निहालला जवळपास १ लाख ३० हजार रुपये देऊन या व्हिडिओचे हक्क विकत घेतले. सध्या निहाल या सगळ्यामधून महिन्याला तब्बल पाच लाखांहून अधिक कमाई करतो.

‘न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा’, अॅसिड हल्ल्यातील पीडितेची चटका लावणारी कथा