व्हॉट्सअॅपमुळे आपलं एकमेकांशी संवाद साधणं खूप सोप्पं झालंय. या एका अॅपमुळे आपण मेसेजसोबतच फोटो, व्हिडिओ, फाईल्स पाठवू शकतो पण त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल देखील करू शकतो. गेल्यावर्षी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचा नवा पर्याय आपल्या युजर्सना दिला होता. आता या फीचर्समध्ये काही बदल करण्याच्या तयारीत व्हॉट्अॅप आहे. सध्या व्हिडिओ कॉलिंग सुरू असताना आपल्याला चॅटिंग करता येत नाही. जर व्हिडिओ कॉलिंग सुरू असताना आपण चॅटबॉक्स पाहायला गेलो तर स्क्रिन पूर्ण ब्लँक होते. तेव्हा या बाबतीत काही अपग्रेट्स आणण्याचा प्रयत्न व्हॉट्सअॅप करत आहेत.

वाचा : बऱ्याच वेळानंतर किनाऱ्यावर आलेल्या व्हेलचं गुढ उकललं

यामुळे व्हिडिओ कॉलिंग करता करता चॅटिंग करता येणं शक्य होणार आहे. जर युजर्सना चॅटिंग करायची असेल तर व्हिडिओचा छोटा बॉक्स स्क्रिनवर दिसेल. तेव्हा चॅट करता करता व्हिडिओ कॉलिंग करणं  अधिक सुलभ होणार आहे. यूट्युब व्हिडिओच्या बाबतीतही व्हॉट्सअॅप एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे युजर्सना व्हॉट्सअॅप विंडोमध्येच यूट्युब व्हिडिओ पाहता येणार आहे.

Viral Video : नवरीचा डान्स पाहून सगळेच चक्रावले