कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियाने खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन व्हेज पदार्थ न देण्याचा निर्णय घेतला. आता एअर इंडियाचा हा निर्णय काही आर्थिक कारणाने घेतला असला तरी यात कुठेतरी पुरेपुर आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न ‘विस्तारा एअर लाईन्स’ने केलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तेव्हा एअर इंडियाच्या या निर्णयावर विस्तारा एअर लाईन्सने मार्मिक जाहिरात केलीय.

वाचा : कुत्र्याचं शेपूट उखडून टाका!; कुमार विश्वास यांचा पाकवर ‘ट्विटरबॉम्ब’

एका बाजूला चिकन बिर्याणी आणि दुसऱ्या बाजूला व्हेज बिर्याणीचा फोटो आहे. त्यावर ‘शाकाहार की मांसाहार तुमची आवड महत्त्वाची’ अशी मार्मिक जाहिरात त्यांनी केलीय. तेव्हा विस्ताराला नेमकं काय बोलायचं आणि त्यांचा रोख कोणाकडे होता हे वेगळं सांगायला नको. सध्या ट्रोलिंगच्या विश्वात योग्य नस पकडून त्याने एअर इंडियाला ट्रोल केलंय. तेव्हा यामागे विस्तारा एअर लाईन्सच्या आयडियाच्या कल्पनेचे सध्या कौतुक होत आहे.

वाचा : दिव्यांग महिलेला वाचवण्यासाठी ‘त्या’ कंडक्टरने आपला पाय गमावला

कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियाने आता खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियातून प्रवास करणाऱ्या ७० टक्के प्रवाशांकडून व्हेज पदार्थांची मागणी केली जायची. तर ३० टक्के प्रवासीच नॉन-व्हेज पदार्थ घ्यायचे. एअर इंडियाचे दरवर्षी ४०० कोटी रुपये फक्त केटरिंगवर खर्च होतात. अनावश्यक खर्चावर कात्री लावण्यासाठी एअर इंडियाने आता इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन- व्हेज पदार्थ न देण्याचा निर्णय घेतला आहे.