लिफ्टचा योग्यप्रकारे वापर म्हणजे प्रत्येकाकरिता एका सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री होय. लिफ्ट वापरताना खालील साध्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री देता येऊ शकते. त्यासाठी लिफ्टचा योग्यप्रकारे वापर कसा करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, शिवाय लिफ्ट बंद पडल्यानंतर काय करावे, हेसुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे.

लिफ्टमधून जाताना मार्गदर्शक सूचना

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

हे करा व हे करू नका-

* खालील घटनांच्या वेळी लिफ्टचा वापर करू नका.

भूकंप, विजा चमकणे, पूर, आग.

वरील घटना घडत असताना जिन्याचा वापर करा. कारण या घटनांमुळे इलेक्ट्रिकल सेवेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

* लोड मर्यादा व प्रवासी क्षमता मर्यादेचे काटेकोरपणे पालन करा.

* जबरदस्तीने लिफ्टचे दरवाजे उघडू नका.

* लिफ्टमधून जात असताना लहान मुलांसोबत प्रौढ व्यक्तीने असणे गरजेचे आहे.

* लिफ्ट कार व हॉल यांच्यामध्ये असलेल्या पोकळीमध्ये कोणत्याही वस्तू टाकू नका.

लिफ्टचा वापर करताना खालील सूचनांचे पालन करा-

* तुमचे गंतव्यस्थान निश्चित करा.

* तुम्हाला ज्या दिशेने जायचे आहे, त्याकरिता लिफ्टला बोलावण्याचे बटन एकदाच दाबा.

* लिफ्ट येत आहे, यासंदर्भातील सिग्नल पाहा किंवा ऐका.

* लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकरिता मार्ग मोकळा ठेवा. जर आलेली लिफ्ट भरलेली असेल, तर दुसऱ्या लिफ्टची वाट पाहा.

* हात, पाय, काठी इत्यादींसारख्या व इतर कोणत्याही वस्तूसह लिफ्टचे बंद होणारे दरवाजे थांबवण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्या लिफ्टची वाट पाहा.

लिफ्टमध्ये जाताना व बाहेर पडताना खालील सूचनांचे पालन करा-

* काळजीपूर्वक लिफ्टमध्ये प्रवेश करा व बाहेर पडा. दरवाजाजवळ उभे असलेल्या प्रवाशांनी प्रथम प्रवेश करावा किंवा बाहेर पडावे.

* आत आल्यानंतर, त्वरित तुम्हाला ज्या मजल्यावर जायचे आहे, त्याकरिता बटन दाबावे आणि दुसऱ्या प्रवाशांकरिता मार्ग मोकळा करण्याकरिता मागील बाजूस सरकावे.

* लहान मुले व पाळीव प्राण्यांना घट्ट धरा.

* कपडे व सामान लिफ्टच्या दरवाज्यापासून दूर ठेवत सुरक्षित अंतर ठेवा.

५. लिफ्टचा दरवाजा उघडाच ठेवण्याकरिता डोअर ओपन बटन दाबून धरून ठेवा किंवा दुसऱ्या कोणा व्यक्तीला बटन धरून ठेवण्याकरिता सांगा.

लिफ्टमधून जात असताना खालील सूचनांचे पालन करा-

* लिफ्टच्या दरवाजांपासून दूर उभे राहा.

* उपलब्ध असल्यास रेलिंग धरून ठेवा.

* मजल्यांचे संकेत देणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवा आणि तुमचे गंतव्यस्थान येताच लिफ्टमधून बाहेर पडण्याकरिता सज्ज राहा.

* लिफ्ट थांबल्यानंतर दरवाजा उघडला नाही, तर डोअर ओपन बटन दाबा. आणि तरीदेखील जर दरवाजा उघडला नाही, तर अलार्म बटन दाबा किंवा टेलिफोन किंवा इंटरकॉमचा वापर करा. योग्य व्यक्ती तुम्हाला मदत करण्यास येईपर्यंत वाट पाहा.

एस्केलेटरवरून राइड करण्याकरिता मार्गदर्शक सूचना-

एस्केलेटरचा वापर करताना खालील सूचनांचे पालन करा-

* काठी, वॉकर्स, गाडय़ा किंवा व्हिल व्हेहिकल्ससह राइड करू नका.

* अनवाणी किंवा सल शू-लेससह राइड करू नका.

* मूव्हिंग स्टेप्सच्या दिशेकडे पाहा आणि पायऱ्या योग्य दिशेने जात आहेत याची खात्री करूनच प्रवेश करा.

* सावधतेने पायरीवर चढा व उतरा. रेलिंगला धरा आणि जर तुम्हाला चष्मा असेल तर अधिक काळजी घ्या.

* लहान मुलांना एका हाताने घट्ट धरा.

* लहान वस्तू एका हाताने घट्ट धरा.

* सल कपडय़ांना पायऱ्या व बाजूच्या भागांपासून सांभाळा.

* चालू नसलेल्या एस्केलेटरचा जिना म्हणून वापर करू नका.

* एस्केलेटरच्या सामानाची ने-आण करण्याकरिता वापर करू नका.

* जर तुम्हाला एस्केलेटरचा वापर करणे सोयीस्कर होत नसेल, तर त्याऐवजी लिफ्टचा वापर करा.

एस्केलेटरवरून जात असताना खालील सूचनांचे पालन करा-

* पायरीच्या मध्यभागी उभे राहा आणि समोरील दिशेने पाहा.

* बाजूच्या भागांपासून पाय दूर ठेवा.

* रेलिंगला घट्टपणे धरा.

* तुमची हँडबॅग किंवा पार्सल्स रेलिंगवर ठेवू नका.

* विरुद्ध बाजूस किंवा रेलिंगवरून वाकून पाहू नका.

* एस्केलेटर पायरीवर बसू नका.

* अनवाणी किंवा सल शू-लेससह राइड करू नका.

* लहान मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असणे गरजेचे आहे आणि त्यांना एका हाताने घट्ट धरून ठेवावे.

* पाळीव प्राण्यांना घेऊन जाऊ शकता.

या मूलभूत सुरक्षितता व सावधगिरीच्या उपायांचा वापर केल्याने आपण लिफ्ट व एस्केलेटरमध्ये होणारे अपघात टाळू शकतो. एका सुरक्षित लिफ्ट व एस्केलेटरचा वापर करताना या साध्या सूचनांचे पालन करा.

जर प्रवासी लिफ्टमध्ये अडकले, तर खालील सूचनांचे पालन करा-

* लिफ्ट तंत्रज्ञांकडून साहाय्य प्राप्त करण्याकरिता अलार्म बटन दाबा, जे लिफ्टमधून बाहेर पडण्यास प्रवाशांना मदत करतील.

* जर लिफ्टमधील कंट्रोल्समधून संवाद साधण्याकरिता कोणताच मार्ग उपलब्ध नसेल, तर लिफ्टमध्ये दर्शविण्यात आलेल्या इर्मजन्सी क्रमांकावर संपर्क साधण्याकरिता मोबाइल फोनचा वापर करा.

* लिफ्ट तंत्रज्ञांशी बोलताना, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. यामुळे लिफ्टमधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल.

* जबरदस्तीने लिफ्टचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका.

* शांत राहा आणि मदतीची वाट पाहा.  

हे करू नका-

* जाणकार नसलेल्या व्यक्तीने लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न करू नये.

* लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करणे, ही पात्र तंत्रज्ञांची जबाबदारी आहे.

* फ्रंट दरवाजापासून दूर राहा आणि सूचना मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही बटनाला स्पर्श करू नका.

लक्षात ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण बाबी-

* लिफ्टला जोडण्यात आलेली दोरी तुटणार नाही याची काळजी घ्यावी.

*लिफ्टला एकापेक्षा अधिक दोरी किंवा बेल्ट जोडण्यात यावेत.

सेबी जोसेफ – व्यवस्थापकीय संचालक, ओटीस एलिव्हेटर कंपनी इंडिया.