पाऊस सुरू पडला की त्यासोबत मातीचा सुगंध आणि सगळीकडे हिरवळही येते. परंतु हाच पाऊस घरमालकांसाठी अनेक प्रश्नही निर्माण करतो. मान्सूनमुळे ओलसर भिंती, सीलिंग व भिंतींना तडे अशा समस्या निर्माण होतात. यामुळे आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. कारण दमटपणा व तडय़ांमुळे बुरशी व एकपेशीय वनस्पतींची वाढ होते. घर अस्वच्छ आणि राहण्यास अयोग्य बनते. यामुळे अ‍ॅलर्जी, अस्थमा, नाक-घसा-डोळ्यांचा त्रास आणि अस्थमा व श्वसनाशी संबंधित अनेक आजारही होऊ  शकतात. परंतु थोडी खबरदारी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ  शकते.

गळतीमुळे केवळ घराचेच नुकसान होत नाही, तर फर्निचर व फर्निशिंग यासहित महागडे इंटिरिअरही खराब होते. उत्तम प्रकारे देखभाल केल्यासारखे दिसणाऱ्या घरात पोपडे उडालेला रंग आणि भिंतीभर व सीलिंगवर पाणी गळल्याच्या खुणांमुळे मान्सूनचा हंगाम संपल्यानंतर याचे परिणाम अधिक गंभीरपणे दिसू लागतात. पोपडे उडालेला रंग, गळके सीलिंग, ओलसरपणाचा वास या याप्रकारामुळे पाहुणे आले की लज्जास्पद वाटू नये म्हणून घरांचे मालक गळक्या भिंती आणि ओले डाग घालवण्यासाठी प्रयत्न करतात, हेही सर्रास आढळते.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

गळती रोखण्यासाठी खबरदारी

  • थोडी काळजी घेतल्यास हे प्रश्न टाळता येऊ  शकतात. उदा., गाळ साचू न देता सांडपाणी व्यवस्था स्वच्छ केल्यामुळे पाणी साचण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
  • सर्वात प्रथम, तुटलेले सर्व ड्रेनेज पाइप बदलून टाकावेत / दुरुस्त करावेत, जेणे करून त्यातून पाणी गळून ते पसरणार नाही.
  • टेरेस व भिंतींवर वाढणारी सर्व अनावश्यक झाडे व तण मुळापासून काढून टाकावेत, तसेच मॉर्टरच्या साहाय्याने पृष्ठभागावर दुरुस्ती करून घ्यावी.
  • तुटलेले सर्व प्लास्टर व तडे दुरुस्त करून घ्यावेत.
  • टेरेस गार्डनमधून येत असलेले पाणी स्लॅबमध्ये शिरू नये म्हणून त्याची योग्य व्यवस्था लावावी.
  • गाळ बाजूला करून सांडपाणी व्यवस्था स्वच्छ करणे गरजेचे आहे. बाजारात मिळत असलेल्या सोल्युशन्सच्या साहाय्याने हे काम घरच्या घरी करता येते.
  • एसी डक्ट्स हे चिंतेचे मुख्य कारण असते. त्यामुळे तेथील गळतीवर प्राधान्याने उपाय करावा.
  • बाथरूममधील फरशांमधील फटी बुजवून टाकाव्यात.
  • पावसाचे पाणी घरात येऊ  नये म्हणून खिडक्या व बाल्कनीसाठी योग्य प्रकारे शेड तयार कराव्यात.
  • सीलंट्सचा वापर करून खिडक्यांतील फटी बुजवून टाकाव्यात.
  • गळतीची किंवा दमटपणाची शक्यता चाचपण्यासाठी तज्ज्ञांकडून घर तपासून घ्यावे.
  • वॉटरप्रूफिंग करून घेण्यासाठी योग्य वेळ म्हणजे, मान्सून सुरू होण्यापूर्वीचा कालावधी. यामुळे प्रचंड पावसापासून घराच्या रचनेचे संरक्षण होतेच, शिवाय तोडफोड व रचना तकलादू होण्यामुळे वारंवार कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीमध्ये व त्रासामध्येही कपात होते.
  • उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य असतो आणि स्ट्रक्चर उभारत असताना वॉटरप्रूफिंग करावे.

आधुनिक विरूद्ध पारंपरिक वॉटरप्रूफिंग

आपण भारतीय अनेकदा ‘जुने ते सोने’ असा विचार करतो. काही बाबतीत हे म्हणणे खरेही आहे. परंतु वॉटरप्रूफिंगच्या जुन्या पर्यायांबाबत हे नक्कीच लागू होत नाही. अनेकदा, एखाद्या स्ट्रक्चरची ऐट वाढवणाऱ्या इमारत, आकर्षक लॉबी, उत्तम पोडिअम पार्किंग व उद्याने या घटकांच्या बाबतीत आर्किटेक्चर व डिझाइनसाठी नावीन्यपूर्ण पावले उचलली गेल्याचे आपण पाहतो. कंत्राटदार स्ट्रक्चरचे फिनिशिंग अचूक करण्यासाठी प्रयत्न करतात. पण टेरेस किंवा बाथरूम किंवा बाह्य़ भिंती अशासाठी वॉटरप्रूफिंगसारख्या मूलभूत बाबींचा विचार करता, अनेकदा याच जुन्या पारंपरिक पर्यायांचा विचार केला जातो. या पर्यायांमुळे काही वेळा गळती आणि शेवटी स्ट्रक्चर कमकुवत होण्याचे परिणाम होत असले तरीही हेच पर्याय वापरले जातात.

पारंपरिक वॉटरप्रूफिंग पद्धती फारशा टिकाऊ नसल्याने कालांतराने त्यामुळे तडे पाडू लागतात. तसेच, हे साहित्य वापरण्यासाठी सहभागी झालेले मनुष्यबळ अकुशल असते. टेरेसच्या बाबतीत, अशा पारंपरिक वॉटरप्रूफिंग पद्धती वापरल्या तर नियमितपणे त्यातून पाणी झिरपते आणि दुरुस्तीसाठी नेहमी खर्च करावा लागतो. याबरोबरच दुरुस्ती करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचा जुना थर तोडल्यानेही स्लॅब कमकुवत होतो. आधुनिक वॉटरप्रूफिंग तंत्र वापरण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज नसते आणि त्यास वेळही जास्त लागत नाही. परंतु ही पद्धत तुलनेने खर्चिक असून, त्यामुळे गळतीपासून अधिक चांगले संरक्षण व अधिक टिकाऊपणा दिला जातो. आधुनिक व्यवस्थेमध्ये इंटिग्रल वॉटरप्रूफिंग हे तंत्र वॉटरप्रूफिंगसाठी सर्वोत्तम तंत्र समजले जाते. हे परवडणारे, वापरण्यास सुलभ व जीवनभर संरक्षण देणारे आहे.

(लेखक कन्स्ट्रक्शन केमिकल्स, पिडिलाइट इंडस्ट्रीजचे जागतिकस्तरावरचे मुख्य कार्यकारी अधिकारी.)