घराला घरपण प्राप्त होते ते त्या घरातील स्त्रीमुळे, हे जरी खरे असले तरी अनेकदा नव्याने घर घेताना ते घरातील कर्त्यां पुरुषाच्या नावानेच घेतले जाते. परंतु आता स्त्रियांनाही- अगदी पार तळागाळातल्या ते मध्यमवर्गीयांपर्यंत स्वत:च्या नावावर घर विकत घेता येऊ शकेल.

तेवीस वर्षीय प्रसिद्ध सिनेतारकेचे मुंबईत स्वत:चे घर, या वर्तमानपत्रातल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतले. खरं तर ही बातमी वाचून आनंददेखील झाला. कारण आज फक्त सिनेतारकाच नाही तर आय. टी. किंवा तत्सम स्वरूपाच्या व्यावसायिक क्षेत्रातील तरुण मुलीदेखील सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा घरामध्येआíथक गुंतवणूक करताना दिसतात. त्याला कारणही तसेच आहे. दागिन्याच्या गुंतवणुकीपेक्षा प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारी असते.

स्वत:च्या नावावर असलेले नि स्वत:चे हक्काचे घर असावे, हा ट्रेण्ड अलीकडच्या काळात स्त्रीवर्गामध्ये लोकप्रिय ठरत आहे. पण हा विचार फक्त उच्चवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयांपुरताच मर्यादित आहे का? तर नाही. अगदी पार तळागाळातल्या महिलांपासून ते मध्यमवर्गातील महिलांसाठीदेखील आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणं सहज शक्य आहे. आजही घरखरेदी प्रक्रियेत पुरुषांचा वरचष्मा जाणवतो. कारण गुंतागुंतीची आणि काहीशी क्लिष्ट स्वरूपाची असलेली प्रक्रिया. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन अस्पायर होम फायनान्स कंपनीने ‘महिला आवास लोन योजनां’ची निर्मिती केली.

काय आहे ही योजना ‘माला’ या नावाने ओळखली जाते. आणि नेमकी कशा तऱ्हेने महिलांसाठी उपयुक्त ठरते याविषयीची माहिती ‘माला’च्या प्रमुख दीपाली िशदे  यांनी दिली.

मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सíव्हसेस या प्रसिद्ध कंपनीचा अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. हा एक महत्त्वाचा भाग. या विभागातर्फे ‘माला’ म्हणजेच ‘महिला आवास लोन योजना’ हा उपक्रम राबविला जातो. या योजनेचे नेमके स्वरूप स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, अनेक स्त्रियांना आपले घर हे आपल्या नावावर असावे, असे वाटत असते. घर घेण्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा पसादेखील त्यांच्या गाठीशी असतो. परंतु घर नि त्यासाठी काढावे लागणारे कर्ज यांसारख्या तांत्रिक बाबींची पूर्तता करताना मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी सोयीस्कर पर्याय म्हणून ते घर नवऱ्याच्या किंवा मुलाच्या नावाने घेतले जाते. नेमकी हीच अडचण सोडविण्याचे काम ‘माला’ करते.

‘माला’मार्फत गृहकर्ज, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, ईएमआय याबाबत मार्गदर्शन केले जाते. इतकेच नाही तर दोन ते बारा लाखापर्यंत कर्जदेखील उपलब्ध करून दिले जाते. ते देखील दहा ते बारा टक्के व्याज दराने.

या योजनेला  विडी कामगार, नस्रेस, सफाई कामगार, शिपाई महिला, बचत गटातील महिला अशा विविध वर्गातील महिलांनी लाभ उठविला आहे. अनेक वष्रे या स्त्रिया आपल्या कुटुंबासह भाडय़ाच्या घरात राहत होत्या. जेव्हा त्यांना या योजनेविषयी समजले तेव्हा त्यांना असे जाणवले की, गृहकर्जावर स्वत:चे घर घेणे सहजशक्य आहे. विशेष म्हणजे, या स्त्रियांच्या नवरे मंडळींनीदेखील यास पािठबा दिला आहे.

बऱ्याच वेळा असे दिसून येते की, घराबाबत करार करताना पहिले नाव नवऱ्याचे असते नि दुसरे त्याच्या पत्नीचे. परंतु या योजनेत घर हे त्या स्त्रीच्या नावावर होत असल्यामुळे सहअर्जदार ( को-अ‍ॅप्लिकंट) म्हणून नवऱ्याचे नाव दुसरे घातले जाते. आणि त्यात आक्षेपार्ह असे या नवरेमंडळींना वाटत नाही. ही निश्चितच लक्षात घेण्याजोगी बाब आहे. कारण स्त्रियादेखील घरमालक होऊ शकतात, हा बदल समाजात स्वीकारला जातोय.

समजा, एखाद्या महिलेने कर्ज बुडविल्यास त्यावर काही कारवाई केली जाईल का, याबाबत आपले मत मांडताना दीपाली सहजपणे म्हणतात, ‘अशी शक्यता फार कमी आहे. मुळातच ज्या वर्गासाठी ही योजना सुरू केली आहे. तो आपल्या कामाच्या बाबतीत खूपसा प्रामाणिक आहे. जेव्हा एखादी महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी येते, तेव्हा तिला या योजनेची इत्थंभूत माहिती दिली जाते. ईएमआय कुठे नि कसा वेळेवर भरायचा इथपासून ते या गोष्टीस विलंब झाला तर कोणत्या प्रकारच्या कारवाईला तोंड द्यावे लागू शकते, हे सर्व नीट समजावून सांगितले जाते.’

बऱ्याचदा अपघात किंवा काही नसíगक आपत्तीमुळे प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास काय, अशी भीती या महिलांच्या मनात असते, पण इथेदेखील विम्याद्वारे गोष्टी सुरक्षित केल्या आहेत. थोडक्यात काय तर, सुरक्षित योजनेचा प्रस्तावच त्यांच्यासमोर असल्याने कर्ज बुडविण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय आमच्या इथे कार्यरत असलेले साहाय्यक वेळोवेळी या महिलांना त्या त्या गोष्टींची आठवण करून देत असतात. उलट अमुक एक तारीख झाली, आमचा ईएमआय घेऊन ठेवा, असे सांगणाऱ्यांची संख्याच जास्त आहे.

दोन जुलै २०१५ साली ही योजना अमलात आणण्यात आली. या वर्षभराच्या कालावधीत आम्ही पाचशेहून अधिक महिलांना त्यांच्या हक्काचे घर देऊ शकलो, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. ही योजना जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोहचावी म्हणून आम्ही अधिक प्रयत्नशील आहोत. यासाठी मुंबई विडी कामगार संघटना, प्रियदर्शनी वुमन्स कॅब अशा विविध महिला संघटनांबरोबर आमची बोलणी सुरू आहेत. तसेच परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या बिल्डर्स व्यावसायिकांचाही यात समावेश केला आहे.

निव्वळ गृहकर्ज पुरविणारी संस्था, इतकेच या योजनेचे स्वरूप मर्यादित आहे, असे नाही तर तळागाळातील आणि मध्यमवर्गातील अर्थार्जन करणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काचे नि स्वत:च्या नावावरचे घर सहजपणे घेता यावे. त्यासाठी योग्य जागा त्यांच्या परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेली ही संस्था आहे, असे म्हटल्यास ते जास्त उपयुक्त ठरेल.

जेव्हा घर घेण्याचा विचार केला जातो, तेव्हा तो घेताना प्रामुख्याने घरातील पुरुष सदस्याचा विचार महत्त्वाचा समजला जातो. आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियादेखील मोठय़ा प्रमाणावर अर्थार्जन करताना दिसतात. यात विवाहित स्त्रियांबरोबर एकल, विधवा,घटस्फोटिता अशा विविध गटांतील महिलांचा समावेश यात आहे. बऱ्याचदा पुरेसा पसा हाती असूनदेखील कर्जाच्या आणि बँकांच्या जाचक प्रक्रियेमुळे अशा स्त्रिया स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न बघत नाहीत. अशा परिस्थितीत दीपाली िशदे आणि त्यांच्या संस्थेने, तुम्हीही स्वप्ने बघू शकतात नि प्रत्यक्षातदेखील आणू शकतात, हा दिलेला दिलासा महिलावर्गासाठी निश्चितच उभारी देणारा आहे.

suchup@gmail.com