विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे सदस्य नसलेल्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मंत्रिपदावर राहता येत नसल्याने शालेय शिक्षण आणि आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री फौजिया खान यांचे मंत्रिपद शुक्रवारी संपुष्टात आले. राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री असलेल्या फौजिया खान यांच्या आमदारकीची मुदत मार्च महिन्यात संपली होती. पक्षाने त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पुन्हा संधी दिली नव्हती. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात कारवाया केल्याने पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मुदत संपल्याने मंत्रिपद संपुष्टात आले असून, कार्यभार सोडल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.