अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा खालसा गावातील दलित हत्याकांडातील आरोपींना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ जातीय अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने शपथविधी सोहळ्याच्या वेळी वानखेडे स्टेडियमवर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती समितीचे श्याम सोनार यांनी दिली. या आंदोलनात आनंद पटवर्धन, सुषमा देशपांडे, रामू रामनाथन, पत्रकार जतीन देसाई आदी सहभागी होणार आहेत.