चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावातील पिढीजात मालगुजार अर्थात, वतनदार फडणवीस कुटुंबातील देवेंद्र फडणवीस हे शरद पवारानंतर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरपंत फडणवीस यांनी विदर्भात जनसंघ रुजवण्यात आणि फुलवण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यांचाच कित्ता त्यांच्या मुलाने गिरवला आणि दिग्गजांना हरवून चारदा आमदारपदाची झुल अंगावर चढवत विदर्भात भाजप मोठा केला. पिढीजात मालगुजार असले तरी नंतर राजकीय कुटुंब, अशी त्यांची ओळख झाली. जनसंघाचे भारतीय जनता पक्षात परिवर्तन झाल्यानंतर ते विधान परिषदेचे सदस्य झाले. याशिवाय, त्यांच्या काकू शोभा फडणवीस यासुद्धा चारदा विधानसभा व एकदा विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या आहेत. युती सरकारच्या काळात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद सांभाळले आहे.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात
बारावीनंतर पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सरचिटणीस पदाकरिता निवडणूक लढण्याचे धर्य दाखवले. यात त्यांना हार पत्करावी लागली, पण येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पाचही वर्ष ‘मेरिट विद्यार्थी’ म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या फडणवीसांचे वडील आमदार गंगाधरपंत फडणवीस यांचे कर्करोगाने निधन झाले. विशीही पार न केलेल्या फडणवीस यांची गंगाधरपंतांचे राजकीय वारसदार म्हणून येथूनच वाटचाल सुरू झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काश्मीर बचाव आंदोलनातील एका चमूचे नेतृत्त्व त्यांनी स्वीकारले. श्रीनगर येथे भारताचा झेंडा रोवण्यापूर्वीच उधमपूर येथे त्यांना अटक झाली. १९९२च्या अयोध्या आंदोलनात त्यांनी रामसेवकांच्या एका गटाचे नेतृत्त्व स्वीकारले आणि तब्बल २२ दिवस कारागृहात काढले. खरा राजकीय प्रवास त्यांचा वयाच्या २२व्या वर्षी नगरसेवकपदाने सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्या टर्मला ते महापौर आणि नंतर आमदार झाले. भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार असताना ते आमदार नव्हते, हे विशेष. पश्चिम नागपूर मतदारसंघातून दोनदा निवडून येऊन मतदार पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून त्यांनी दोनदा विजय मिळवला. विधानसभेत सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अभ्यासू व व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे, तसेच उत्कृष्ट वक्ता म्हणून बहुमान मिळवला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांची स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली आहे. आजवर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा किंवा राजकीय तडजोडी केल्याचा आरोप त्यांच्या नावावर झालेला नाही.
कुटुंबाचा पाठिंबा
वडिलांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या घरातून कायम पाठिंबा व सहकार्य मिळाले. लग्नाआधी आई आणि लग्नानंतर आई सरिता व पत्नी अमृता यांनी पावलोपावली त्यांची सोबत केली. घरच्या जबाबदारीतून त्याला मुक्त केले. त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यापासून तर इतर सर्व बाबतीत कायम त्या त्यांच्यासोबत आहेत. आशिष फडणवीस हा त्यांचा थोरला बंधू आणि अभिजीत फडणवीस हा शोभा फडणवीस यांचा मुलगा कायम त्यांच्यामागे सावलीसारखे सोबत करीत आहेत. संजय फडणवीस, राहुल फडणवीस, प्रसन्नजीत फडणवीस हे चुलत भाऊ, जयराम तेलंग हा आत्येभाऊ, मंजूषा दीक्षित व भावना खरे या शोभा फडणवीस यांच्या मुली, तसेच स्वाती फडणवीस-साठे, संजीवनी फडणवीस-धारकर या चुलत बहिणी आणि वसुधा चांदूरकर व सुमेधा पोळ या आत्ये बहिणी कायम देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहिले. एकंदरीत बहीण-भावांचे प्रचंड पाठबळ त्यांच्यामागे सुरुवातीपासूनच आहे.
अल्पपरिचय
’नाव – देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस
’जन्म – २२ जुलै १९७०
’राजकीय प्रवास : १९९९, २००४, २००९, २०१४ – महाराष्ट्र विधानसभा सदस्य १९९२ ते २००१ – नागपूर महापालिकेत नगरसेवक १९९७ ते १९९९ – महापौर, महापालिका नागपूर
’पुरस्कार : राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे सवरेत्कृष्ट संसदपटू पुरस्कार (२००२-२००३) राष्ट्रीय आंतरविद्यापीठ वादविवाद स्पध्रेत सवरेत्कृष्ट वक्ता पुरस्कार.
दिवं. प्रमोदजी महाजन सवरेत्कृष्ट संसदपटू पुरस्कार.
माधवराव लिमये उत्कृष्ट लोकप्रतिनिधी पुरस्कार.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
bacchu kadu, Ramtek,
बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’
Nominate BJP for Dharashiv Delegation demands to Devendra Fadnavis
धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी
Narendra Modi
‘चारसौ पार’चा नारा देणारे नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले, अक्कलकोटमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल