करिअरची व्याप्ती आता इतकी मोठी झाली आहे की खेळ फक्त वेळ घालवायचं, आनंदाचं साधन राहिलेलं नाही तर खेळांची आवड असणाऱ्याला आता खेळात करिअर करण्याच्याही खूप संधी उपलब्ध आहेत.

शाळेत मग ती प्राथमिक असो वा माध्यमिक, सर्वच विद्यार्थ्यांना सर्वात आवडता तास कोणता असेल तर पी. टी. किंवा पी. ई.चा तास. त्या कोवळ्या वयामध्ये आठ तास वर्गात बंद राहण्यातून एखादा तास मैदानावर खुल्या हवेत खेळायला-बागडायला मिळणार याचाच आनंद मुला-मुलींना असतो. अवघड गणिते किंवा इतिहासातील सनावळ्यांच्या दडपणातून बाहेर खेळकर शिक्षकांचा हा तास सर्वानाच हवाहवासा वाटत असतो. ज्या गोष्टीत आपल्याला रस आहे किंवा जे करताना आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळतो तेच क्षेत्र जर आपले भावी जीवनातील करिअर असेल तर त्याहून मोठे भाग्य नाही.

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

साहजिकच किमान ५० टक्के विद्यार्थी जे खेळांमध्ये रमतात त्यांच्यासाठी जर क्रीडाक्षेत्र हेच करिअर बनले तर त्याहून मोठा आनंद काय? होय, भारतातही आता क्रीडा / खेळ हा एक करिअरचा चांगला पर्याय आहे. जग बदलतंय, काळ बदलतोय.. खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा प्रगत राष्ट्रांमध्ये जे महत्त्व मिळत होतं तसं ते आता भारतातही मिळू लागलंय.

काय काय पर्याय आहेत क्रीडा क्षेत्रात करिअर बनवायचे?

१) चांगला खेळाडू बनणे : क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खेळाडू. आज भारतात कोणत्याही खेळात जर प्रावीण्य मिळवले तर केवळ प्रसिद्धीच मिळते असं नाही. तर करिअरही बनू शकते. मान-सन्मानाबरोबर बक्षिसांची खरातही आता अद्वितीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर होत आहे. सरकारी, निम-सरकारी वा खासगी क्षेत्रात उत्तम पदावर नोकऱ्या उपलब्ध आहेत. वेळीस शैक्षणिक पात्रता डावलूनही भरभक्कम पगाराच्या नोकऱ्या चांगल्या खेळाडूंना मिळतात. गरज आहे ती योग्य वयात पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची. लहान वयात चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना तर पुढील प्रवास खूपच सोपा होतो. चांगल्या प्रशिक्षकांखाली कठोर परिश्रम घेऊन त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते. हे सर्व खूप खर्चीक आहे असेही नाही. गरज आहे ती पाल्यापेक्षा पालकांच्या जागरुकतेची. ‘खेलोगे कुदोगे बनोगे खराब, पढोगे लिखोगे बनोगे नवाब’चा जमाना आता गेलाय. आपल्या पाल्याला जर खेळात रस असेल तर पालकांनी वेळीच त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. कुटुंबातील एक खेळाडू केवळ स्वत:चेच नव्हे तर पूर्ण कुटुंबाचे नाव व सामाजिक स्थान उंचावतो. एक इंजिनीअर डॉक्टरपेक्षा समाजात वेगळा सन्मान मिळणारा, वृत्तपत्रांमध्ये रकाने भरून कौतुक करवणारा किंवा टीव्हीवर ज्याला पाहायला करोडो चाहते उत्सुक असतात असा पाल्य हा त्या कुटुंबाचा अभिमानाचा सर्वोच्च बिंदू असतो.

२) प्रशिक्षक : सर्वच खेळाडू अत्युच्च शिखर गाठू शकत नाहीत. पण असे खेळाडू उत्तम प्रशिक्षक बनू शकतात. बीपीईडी, एनआयएस हे कोर्सेस करून शाळा-कॉलेजेस राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विविध संस्थांमध्ये सहज नोकरी मिळू शकते. आजकालच्या खेळांच्या व्यावसायिकीकरणामुळे खासगी संघ / संस्था यामधूनही करिअर बनवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूबरोबर त्याच्या प्रशिक्षकालाही तितकाच सन्मान व आर्थिक मदत मिळते.

३) फिटनेस ट्रेनर्स : आजकालच्या तणावपूर्ण जीवनात सर्वानाच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटले आहे. व्यावसायिक  खेळाडूंप्रमाणेच सर्वसामान्यही आता ‘जिम कल्चर’कडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांबरोबरच, भारतीय व्यायामशाळांचंही जाळं आता देशभर पसरतंय. तंत्रशुद्ध व्यायामाचे अनेक कोर्सेस आज उपलब्ध आहे व ते करून फिटनेस गुरू होण्याचे मार्ग आता खुले झालेयत. पर्सनल ट्रेनर्स, सेलिब्रिटी ट्रेनर्स हे तर काही उच्चशिक्षित व्यावसायिकांएवढीच कमाई करू शकतात.

४) फिटनेस ट्रेनर्सच्या धर्तीवर आता आहारतज्ज्ञांनाही खूप मागणी आहे. आकर्षक दिसण्यापासून ते तंदुरुस्त आरोग्यासाठी सर्वच वयोगटांत आज खूप जागरूकता आहे. आहारतज्ज्ञ बनण्यासाठी बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. अशा कोर्सेसनंतर  व्यावसायिक संघांव्यतिरिक्त  हॉस्पिटल्स, जिम्स, पंचतारांकित हॉटेल्स इ.  ठिकाणी नोकरी मिळू शकते.

हे झाले प्रत्यक्ष खेळाशी निगडित करिअर विकल्प पण याही शिवाय क्रीडा क्षेत्रात अनेक करिअर अ‍ॅडव्हेंचर्स उपलब्ध आहेत.

१) क्रीडा पत्रकारिता : ज्याप्रमाणे राजकीय वा सामाजिक घडामोडींसाठी वृत्तपत्राचे पहिले पान पाहिले जाते तसेच क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी पाठीमागचे पान राखून ठेवले जाते. विनोदाने असे म्हणतात की वृत्तपत्राची पहिली पाने वाचून येणारी मरगळ क्रीडावृत्ताची पाने वाचून निघून जाते व वाचक ताजातवाना होऊन दिवसभराच्या संघर्षांसाठी उमेद होऊन बाहेर पडतो. आवडत्या खेळाचा विशेष अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवता येते व पदोन्नतीबरोब्राच समाजात वेगळा मान मिळतो. प्रिंट मीडियाप्रमाणे आता दूरचित्रवाणीवरही क्रीडा पत्रकारांना वाढती मागणी आहे. क्रीडा वाहिन्यांबरोबरच समाचार वाहिन्यांमध्येही क्रीडा पत्रकारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खेळातील बारकाव्यांचे सखोल ज्ञान; त्या खेळातील इतिहास सध्या त्या खेळातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा याचा अभ्यास यासाठी गरजेचा असतो.

२) सध्याच्या युगात सर्वच खेळांना दूरचित्रवाणीवर प्रमुख स्थान मिळतंय आणि त्यामुळेच क्रीडा समीक्षक किंवा समालोचक (कॉमेंट्रेटर) या पदासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारदस्त व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट  बोलण्याची ढब, भाषेवर प्रभुत्व व खेळाचे सखोल ज्ञान या गुणांची जोपासना केल्यास समालोचक हा आकर्षक पगार देणारा व बरोबरच प्रसिद्धी देणारा पर्याय बनला आहे.

भारतात आता खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे तर व्यवसाय बनलाय. मग ते क्रीडासामग्री, क्रीडा पेहरावनिर्मिती असो किंवा कॉपरेरेट जगतासाठी वेगवेगळे स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करणे असो. हे चांगले करिअर ऑप्शनच आहेत. बहुतेक खेळांच्या व्यावसायिक लीगने आता भारतात चांगलाच पाय रुजवलाय. या लीगमुळेसुद्धा करिअरच्या किंवा व्यवसायाच्या खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. लीग मॅनेजर्स, टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्ससारख्या पदांसाठी वाढती मागणी आहे. स्पोर्ट्स, मॅनेजमेंटची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मुला-मुलींना अशा बडय़ा पगाराच्या व जबाबदारीच्या पदांसाठी मोठी मागणी आहे. व्यावसायिक टीम उभी करणे, वाढवणे व यशस्वी करणे याबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर करणे ही आव्हाने या क्षेत्रात असतात. मार्केटिंग, हय़ुमन रिसोर्सेस (पी. आर.) याबरोबरच खेळाचे ज्ञान या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी या क्षेत्रात वेगाने प्रगती करतात.

क्रीडा – संघटक, पंच – सामनाधिकारी, स्कोअर्स / स्टॅटिस्टिशयन्स , व्हिडीओ अ‍ॅनालायझर्स इ. क्रीडा क्षेत्राशी  निगडित क्षेत्रातही चांगले करिअर व आर्थिक मोबदला मिळू लागलाय.

एकंदरीतच ज्यांना अभ्यासात जास्त रस नाही पण खेळावर नितांत प्रेम आहे, अशा विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर बनवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. केवळ पैसेच नाही तर प्रसिद्धी आणि त्याहीपेक्षा प्रचंड मानसिक आनंद देणारं, सदृढ स्पर्धात्मक समाधान देणारं क्रीडा क्षेत्र हे आता नवीन भारताचं एक प्रमुख क्षेत्र बनतंय.
राजू भावसार – response.lokprabha@expressindia.com