तो दिवस माझ्या आजही लक्षात आहे, हॉस्पिटलची नेहमीची कामं मी करत होते. पण त्यामध्ये लक्ष लागत नव्हतं, एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवत होता. या स्थितीत काम न करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या सहकारी डॉक्टरला माझं काम सोपवून मी माझ्या केबिनमध्ये आले आणि  खुर्चीत डोळे मिटून निवांत टेकले, डोळ्यांसमोर फक्त अंधार असला तरी विचारांचा गोफ मात्र अधिक गुंतागुंतीचा  होता. वेळ निघून जात होती, पण अस्वस्थपणा कमी होण्याचं काही लक्षण दिसत नव्हतं. डोळे उघडले आणि दीर्घ श्वास घेतला आणि घोटभर पाणी पिण्यासाठी जागेवरून उठले, माझं लक्ष तिथे ठेवलेल्या पेढय़ाच्या खोक्याकडे गेले. हॉस्पिटलमध्ये मूल जन्माला आल्यावर मिठाई देणारे अनेक असतात त्यापैकी एक पाटीलआजी माझ्या आठवणीत आहेत. पेढय़ाचा खोका हातात घेतला, पेढा खाऊन तोंड गोड होण्याऐवजी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. पाटीलआजीसोबत झालेला संवाद माझ्या अस्वस्थेचं कारण होतं.

सत्तरीकडे झुकलेल्या पाटीलआजी गावातून शहरात मुलीच्या बाळंतपणासाठी आल्या होत्या. आदल्या रात्री त्यांच्या मुलीला मुलगा झाला होता. नातू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. माझ्या हातात पेढय़ाचा खोका देत म्हणाल्या, ‘‘डॉक्टर, नातू झाला त्याबद्दल तुम्हाला ही गोड भेट.’’

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

त्यांचा ‘नातू’ या शब्दावर जरा जास्त जोर वाटला म्हणून त्यांची ती गोड भेट स्वीकारत मी बोलले, ‘‘आजी, मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखंच.’’

माझं वाक्य पूर्ण होताच त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘हो मला माहीत आहे, मला पण दोन मुलीच आहेत, मुलगा असावा असा अट्टहास कधी नव्हता.’’

त्यांचं बोलणं ऐकल्यावर मी त्यांना उगाच बोलल्याचे जाणवलं, मी माफी मागताच त्या म्हणाल्या, ‘‘माफी कशासाठी मागता तुमचं ते काम आहे आणि तुम्ही ते केलंत. खरं सांगू? मुलगा नसल्याची खंत मला कधीच नाही. मुलीला मुलगी झाली असती तरी आनंद झाला असताच. पण आज तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर नातू झाल्याचा आनंद जास्त वाटला, तुम्हाला तसं वाटलं यात तुमचा दोष नाही, कदाचित पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टी आपल्या मनात अशारीत्या ठासलेल्या की बदलणं कठीण जातं. नैसर्गिकरीत्या मुलगा आणि मुलगी यांच्या जडणघडणीत फरक असतो ते खरं. पण त्यामध्ये आपणच पारंपरिक  गोष्टींची भर पडतो. आता हेच बघा, मुलगा झाला की पेढा आणि मुलगी झाली कीबर्फी याचा शोध आपण लावला. अगदी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात त्याच्यासाठी रुपया आणि तिच्यासाठी अंगठी असाच विचार करतो. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन.’’

पाटीलआजी पोटतिडकीने बोलत होत्या. पाटीलआजींचं बोलणं विचार करण्यासारखं होतं. सहज म्हणून त्यांना विचारलं, ‘‘तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर कधी मुलगा हवा म्हणून दबाव नाही आणला?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला अक्षरांची थोडी फार ओळख आणि माझे सासू-सासरे दोघं अशिक्षित, पण विचाराने सुधारलेले. त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास झाला नाही.’’

त्या अगदी सहज बोलून गेल्या, ‘अशिक्षित पण विचाराने सुधारलेले.’ एका वाक्यात त्या बरंच काही सांगून गेल्या.

सर्वसामान्यपणे विशिष्ट घटना समाजाच्या विशिष्ट स्थरामध्ये घडते असा आपला समज असतो. शिक्षणाने आपल्या विचारात फरक पडतो असाही आपला समज असतो. पण खरंच तसं असतं का? मुलगाच हवा हा आग्रह समाजाच्या सगळ्या स्तरातून केला जातो. शिक्षणाचा आपल्या विचारांशी काही संबंध असतो असं मला कधी वाटत नाही. तसं असतं तर कुठलीही गर्भलिंग निदान चाचणी केली गेली नसती.

सुशिक्षित असून असं कृत्य करण्यास कसे तयार होतात हे माझ्यासाठी न उलगडणारं कोडं होतं, पण त्याचं उत्तर डॉक्टर असलेल्या माझ्या नवऱ्याने दिलं. माझ्या पहिल्या गर्भधारणेच्या वेळी मी गर्भलिंगनिदान चाचणी करावी असा माझ्यावर दबाव होता. आपलं हॉस्पिटल, आपण डॉक्टर कोणाला काय कळणार या विचाराला पारंपरिक विचारसरणीचा आधार होता. माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले, मी गर्भलिंगनिदान चाचणी करावी अथवा मी घटस्फोट द्यावा.

आज मी घटस्फोट घेऊन माझ्या मुलीबरोबर स्वतंत्र राहते. चुकीच्या पारंपरिक विचारसरणीचा नाश करून नवीन आधुनिक सुधारित विचारांची नवज्योत तेवत ठेवणे गरजेचे आहे.
दीप्ती वारंगे – response.lokprabha@expressindia.com