स्पिंझने हिप्नोटी व रिजुव्ह हे दोन प्रीमिअम डीओ बाजारात आणले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार हिप्नोटी हा मनमोहक फ्रुटी फ्लोरल सुगंध व रिजूव्ह हा फ्रेश सायट्रस लाइम फ्रेग्रन्स असून दोन्ही सुगंध २४ तासांपर्यंत टिकून राहतात. दोन्ही डीओडरंटस सर्वत्र उपलब्ध आहेत. खास कॉलेजगोईंग मुलांमध्ये स्पिंजची क्रेझ मोठय़ा प्रमाणात असल्याने या कंपनीची विविध उत्पादनं बाजारात दाखल होताहेत.

‘रेडी टू इट’ रसगुल्ला
रेडी टू कुकची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की विचारता सोय नाही. वेळ नसल्यास रेडी टू कुकचा पर्याय सर्वात बेस्ट. पण आता या पर्यायाबरोबरीने रेडी टू इट हा एक नवा पर्याय आपल्यासमोर ओपन झालेला आहे. खास गोडाचे पदार्थ आता रेडी टू इट आपल्याला खायला मिळणार आहेत. रसगुल्ले आणि गुलाबजामबाबतची ही आवड लक्षात घेऊन केविन केअरच्या गार्डनने ‘रेडी टू इट’ रसगुल्ला आणि गुलाबजाम बनवले आहेत. हे गुलाबजाम छान मऊ  असून ते शुद्ध तुपात बनवले असल्याचा कंपनीचा दावा आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही ते डिशमध्ये घालून खायला तर देऊ शकताच शिवाय कुणाच्या घरी पाहुणे म्हणून जाणार असाल तर भेट म्हणून पण देऊ शकता.  अर्थात केविन केअरने रसगुल्ले आणि गुलाबजामबरोबरच गार्डनची इलायची, पाइनअ‍ॅपल आणि ऑरेंज, चॉकलेट या फ्लेवरमधील सोनपापडीदेखील बाजारात आणली आहे.

ऑस्टरचा मिक्सर
मिक्सर नसेल तर हल्लीच्या गृहिणींना कामच करता येणार नाही. तो किचनमध्ये अपरिहार्य आहे. त्यामुळेच मिक्सरचे मार्केटही मोठे आहे. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे मिक्सर त्यात नवनव्या गोष्टी सतत समाविष्ट करत बाजारात आणत असतात. प्लास्टिकचा वापर केलेले मिक्सर सध्या वापरले जात असतात. पण काही गृहिणींना धातूंचेच मिक्सर गरजेचे वाटतात. त्यांच्यासाठी ऑस्टरनेही संपूर्ण धातूचा मिक्सर आणि ग्राइंडर बाजारात आणला आहे. या मिक्सरला ७५० व्ॉटची मोटर असल्याने इतर मिक्सरच्या तुलनेत याची क्षमता जास्त असल्याचा कंपनीचा दावा आहे. मिक्सरबरोबर बदलता येणारे तीन जार आहेत. या मिक्सरची भांडी वेगळी करता येतात. त्यामुळे ती स्वच्छ करणे सोपे आहे.