बँकिंग सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज असून त्यामुळे ग्राहक व ठेवीदारांचा विश्वास दृढ होऊ शकतो, असे प्रतिपादन भारतीय रिझव्‍‌र्हे बँकेचे माजी कार्यकारी संचालक व सव्‍‌र्हिसेस बोर्डाचे सदस्य एस. करुप्पासामी यांनी केले.
येथील श्री समर्थ बँकेच्या डेटा सेंटर आणि मुख्य शाखेच्या एटीएम तसेच नुतनीकरण केलेल्या दालनाचे उद्घाटन करुप्पासामी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे ज्या प्रकारे नियंत्रण आहे. त्याप्रमाणे समर्थ बँकेचे कामकाज सुरू असल्याचे करुप्पासामी यांनी सांगितले.
बँकेच्या शहरात सात शाखा व दोन एटीएम केंद्र कार्यरत आहेत. बँकेच्या मुख्य शाखेतही एटीएम केंद्र सुरू करण्यात येत आहे. खातेदारांना त्यांच्या व्यवहाराची माहिती एसएमएसद्वारे देण्याची सुविधा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे. नागरी सहकारी बँका छोटे उद्योग, व्यावसायिकांना, व्यापारी, सर्वसामान्य खातेदारांना अर्थ सहाय्य करतात. त्याप्रमाणे बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणाप्रमाणे जास्तीत जास्त वित्त पुरवठा करावा असे करूप्पासामी यांनी नमूद केले.
व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष वासुदेव रवळगांवकर, उपाध्यक्ष डॉ. रविकिरण निकम, मानद कार्यकारी संचालक विवेकानंद उमराणी, ज्येष्ठ संचालक मधुकर कावळे अ‍ॅड. लक्ष्मण उगांवकर आदी उपस्थित होते.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….