आपला परिसरच नाही, तर अगदी देशाविषयीही चिमुकल्यांच्या काही कल्पना असतात. त्यांचेही वेगळे जग असते. त्यांच्या ‘स्वप्नातला भारत कसा असावा’, ही संकल्पना घेऊन तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि भाजप उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी नुकत्याच एका बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. सुमारे दोन हजाराहून अधिक मुलांनी त्यांच्या मनातील भारताविषयीच्या कल्पना कागदावर साकारल्या आणि सर्व जण हरखून गेले.
वांद्रे येथील सिटी पार्कमधील खुल्या पटांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेखा महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कॅमलीनचे श्रीराम दांडेकर, आमदार आशीष शेलार, पराग अळवणी उपस्थित होते.